शेती आणि ट्रॅक्टर हे एकमेकांशी निगडित समीकरण आहे आपल्याला माहिती आहे. यामध्ये जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर ज्याप्रमाणे मोठी ट्रॅक्टर शेतीसाठी उपयुक्त आहेत अगदी त्याखालोखाल छोटी अर्थात मिनी ट्रॅक्टर देखील कमी नाहीत. शेतीतील बऱ्याचशा कामांसाठी अशा मिनी ट्रॅक्टरचा वापर शेतकरी बंद करतात.
मिनी ट्रॅक्टर चा सर्वाधिक वापर हे फळ बागातदार शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. कारण फळबागा मधील आंतरमशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टर खूप उपयुक्त ठरतात.
परंतु अशी ट्रॅक्टर घेताना शेतकरी बंधूंना परवडतील आणि शेतीच्या कामामध्ये उत्कृष्ट रीतीने काम करु शकतील अशी ट्रॅक्टर असणे खूप गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आपण या लेखामध्ये फार्मट्रेक कंपनी च्या एका छोट्या अर्थात मिनी ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत.
फार्मट्रेक कंपनीचा 'ॲटम 26'
जर आपण फार्मट्रेक ऍटम 26 या ट्रॅक्टरचा विचार केला तर ज्या पद्धतीने मोठी ट्रॅक्टर सर्व पर्याय आणि फायदे देतात त्याच पद्धतीने हा ट्रॅक्टर देखील तेवढाच उपयोगी आहे. फार्मट्रेक मिनी ट्रॅक्टर 26 एचपीमध्ये असून यामध्ये तीन सिलेंडर आणि 2700 इंजिन रेट रिव्होल्यूशन प्रति मिनिट आहे. या ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता ADDC-750 युनिट असल्यामुळे शेतीतील विविध अवजारे ओढण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये चांगली आहे.
शेतीतील बरीचशी कठिण कामे सहजतेने पार पाडण्यासाठी या ट्रॅक्टर मध्ये 80 एनएमच्या उच्च टॉर्कसह मजबूत शक्ती प्रदान करतो. त्यामुळे अवजारे कार्यक्षमतेने चालण्यासाठी उपयुक्त आहे. कठिण पृष्ठभागावर तसेच शेतीत खडबडीत रस्त्यावरून जाण्यासाठी देखील याची शक्तिशाली सिल्वर कलर बॉडी खूप उपयुक्त ठरते.
या ट्रॅक्टरची किंमत
फार्मट्रेक मिनी ट्रॅक्टरची किंमत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या ट्रॅक्टरची किंमत अंदाजे 4 लाख 80 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्याची कमाल! बिबीएफ तंत्राद्वारे घेतोय लाखों रुपयांमध्ये उत्पन्न; जाणून घ्या पद्धती
Share your comments