1. यांत्रिकीकरण

महत्वाचे:कोणत्या कृषी यंत्रावर किती मिळते अनुदान,करायचे असेल माहिती तर 'हे' अँप ठरेल उपयोगी

यांत्रिकीकरण हे भारतीय कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचे अंग होऊन बसले आहे. शेतीमध्ये आता सगळ्याच टप्प्यांमध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. पीक लागवडीपूर्वीची पूर्वमशागत असो की पिकांची लागवड असो किंवा कापणी त्यासाठी विविध यंत्राचा वापर केला जात आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
Useful mobile application

Useful mobile application

यांत्रिकीकरण हे भारतीय कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचे अंग होऊन बसले आहे. शेतीमध्ये आता सगळ्याच टप्प्यांमध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. पीक लागवडीपूर्वीची पूर्वमशागत असो की पिकांची लागवड असो किंवा कापणी त्यासाठी विविध यंत्राचा वापर केला जात आहे.

कृषी क्षेत्रामध्ये यंत्रांचा वापर वाढावा यासाठी शासनाकडून देखील प्रोत्साहन दिले जाते. विविध प्रकारच्या कृषी यंत्रांवरशासनाकडून अनुदान दिले जाते.

परंतु कुठल्या यंत्रावर किती अनुदान मिळते हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसते. यासाठी  केंद्र सरकारनेकाही वर्षांपूर्वी एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले होते.

ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकऱ्यांना कुठल्या यंत्रावर किती अनुदान मिळते हे सहज समजते. या लेखामध्ये आपण या उपयुक्त मोबाईल ॲप्लिकेशन विषयी माहिती घेऊ.

 महत्वपूर्ण मोबाईल ॲप्लिकेशन

 मागील काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने 'फार्म मशिनरी सोलुशन' अर्थात FARMS मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले होते.

याच्या मदतीने  शेतकऱ्यांना कृषी यंत्रावर किती अनुदान मिळते हे जाणून घेता येते. याशिवाय या ॲपच्या मदतीने  तुम्ही यंत्राची नोंदणी केल्यानंतर जवळ असलेल्या कस्टमर हायरिंग सेंटरला भेट देऊ शकता किंवा संबंधित यंत्र अनुदानावर खरेदी करू शकतात. तसेच तुम्हाला कृषी यंत्र देखील भाड्याने घेता येतात.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेवटची संधी! 90 टक्के अनुदानावर शेतात सौरपंप बसवण्यासाठी नाव नोंदणी सुरू, वाचा सविस्तर

याच्या मदतीने शेतकऱ्यांना  ट्रॅक्टर, ट्रेलर आणि रोटावेटर अशा सर्व यंत्रसामग्री खरेदी करता येणे शक्य असून या ॲप्स चा वापर शेतकऱ्यांना करायचा असेल त्यासाठी हे ॲप अगोदर मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाऊनलोड करावे लागते.

डाउनलोड केल्यानंतर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागते. जर तुम्हाला कृषी यंत्र भाड्याने घ्यायचे असतील तर त्यांना वापर करता श्रेणीमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल.

आणि जर तुमच्याकडे यंत्रे असतील आणि तुम्हाला भाड्याने द्यायचे असतील तर तुम्हाला पुरवठादाराच्या श्रेणीत रजिस्ट्रेशन करावे लागते. हे ॲप बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

नक्की वाचा:ड्रोन सबसिडी: 'या'सर्वोत्तम कृषी ड्रोनवर मिळू शकते तुम्हाला 100% सबसिडी, वाचा सविस्तर माहिती

English Summary: Farms mobile application is useful for know about subsidy to all farm machinary Published on: 12 July 2022, 01:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters