1. यांत्रिकीकरण

याएकाच ॲपद्वारे शेतकऱ्यांना मिळेल आता बियाणे ते बाजारपेठेपर्यंत याची सर्व माहिती, जाणून घेऊ या विषयी सविस्तर माहिती

सध्या शेतीमध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणे सोपे झाले असून शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी आता घरबसल्या आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने समजायला मदत होते

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
e naam platform

e naam platform

सध्या शेतीमध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणे सोपे झाले असून शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी आता घरबसल्या आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने समजायला मदत होते

.बदलत्या काळाप्रमाणे शेती पद्धतीही बदलत आहे. यामध्ये अजून काही बदल करण्याच्या उद्देशाने सरकारने एक पाऊल उचलले आहे. E-NAAM ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार असून या सेवेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील शेतकरी संघटना, शेतकरी तसेच उत्पादक कंपन्या या एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत.या ॲपच्या माध्यमातून देशातील शेतकरी राष्ट्रीय कृषी बाजाराची कनेक्ट झाल्याने शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. जवळ जवळ या माध्यमातून एक कोटी 75 लाख शेतकरी जोडले जाणार आहेत. इनाम चे संपूर्ण डिजिटल इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर सुमारे एक कोटी 75 लाख नोंदणीकृत शेतकरी तसेच शेती उत्पादक कंपन्या, कमिशन एजंट तसेच व्यापारी आणि इतर भागधारक ये नाम प्लॅटफॉर्म सोबतच या सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.

शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येत असून या प्लॅटफॉर्मच्या मदतीने जास्तीत जास्त सेवा देणारे प्रदात्यानांशेतकऱ्यांसोबत जोडले जात आहे. इनाम सोबत संलग्न असलेल्या शेतकऱ्यांना पर्यायांची कमतरता भासू नये आणि त्याच्याशी जोडून जास्तीत जास्त नफा मिळू शकतात हा त्यामागील हेतू आहे. इनाम प्लॅटफॉर्म एप्रिल 2016 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. सद्यस्थितीत यामध्ये बावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दहा बाजार समित्या जोडण्यात आले आहेत. आतापर्यंत या पोर्टल वर एक कोटी 72 लाख शेतकरी, 2050 शेतकरी उत्पादक कंपन्या तर दोन लाख 13 हजार व्यापारी आणि सुमारे एक लाख कमिशन एजंट यांची  नोंदणी यावर करण्यात आली आहे.

सध्या या प्लॅटफॉर्मवर वाहतूक, पुरवठा, हवामान अंदाज आणि फिन्टेकसेवा अशा खाजगी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम झाल्यानंतर इनाम सोबत संलग्न शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत. सध्या सुमारे 530 बाजार समित्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने व्यापार सुरू असून संबंधित राज्यासाठी वैध असलेले सुमारे 97 हजार परवाने इनाम प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत 2 लाख  व्यापाऱ्यांना देण्यात आले आहे.(स्त्रोत-टीव्ही नाईन मराठी)

English Summary: e naam app to do help to farmer for market and all facilitu related by farming Published on: 12 February 2022, 10:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters