1. यांत्रिकीकरण

Dhan Sheti : धान शेतीमध्ये उपयुक्त यंत्र व अवजारे

Dhan Lagwad : साधारणतः एका महिन्यानंतर उगविलेल्या धान रोपांमध्ये हलके नांगरण केल्या जाते याप्रकारे जमिनीची मशागत करून धान पिकास फुटवे फुटण्यास व तण नियंत्रणासाठी मदत होते. सदर पद्धतीला स्थानिक भाषेत बासी म्हणतात . पुर्व विदर्भात वैनगंगेच्या खोऱ्यात हि पद्धत प्रचलीत आहे. परंतु यामध्ये कमी उगवण क्षमता, रोपातील असमान अंतर, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन, काढणीसारख्या बाबीमुळे धानाची उत्पादकता कमी दिसून आलेली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
paddy farming update

paddy farming update

श्री.ज्ञानेश्वर वि.ताथोड, डॉ.संदीप शा.कऱ्हाळे

गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या पुर्व विदर्भातील जिल्ह्यात प्रत्यक्ष पडणाऱ्या पर्जन्यमानाची सरासरी १२०० ते १७०० मिमी.आहे. हवामानाच्या सतत बदलामुळे पर्जन्यमानात अनिश्चितता आहेच, तसेच पर्जन्यमानाचे प्रमाण जरी तितकेच असले तरी पाऊस पडण्याचे दिवस मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. पावसाचा कालावधी हा ४ महीने जरी असला तरी प्रत्यक्ष पडणारा पाऊस हा ४८-५४ दिवस इतक्या कमी कालावधीतच पडतो.यालाच आपण एकूण पावसाचे दिवस असे म्हणतो. या अश्या अती पर्जन्यमानाच्या प्रदेशात धान खरीप हंगामातील महत्वाचे पिक आहे. परंतु पारंपरिक पद्धती चा वापर जास्त असल्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे तसेच कमी झालेल्या पावसांच्या दिवसांमुळे खरिप हंगामातील धान लागवडीवर, उगवण क्षमतेवर, कीड व रोगांच्या वाढत्या प्रभावामुळे धानाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होत आहे.

पुर्व विदर्भात आवत्या पद्धत ही दोन प्रकारची असून यामध्ये पारंपारिक आवत्या (धान बियाणे फेकुन) व पेरिव आवत्या (पेरणी पद्धत) यांचा समावेश होतो. पारंपारिक आवत्या पद्धतीत पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीची मशागत करून जमीन वापसा स्तितीत आल्यावर प्रती एकरी ३०-३५ किलो धान बियाणे फेकुन (फोकुण) आवत्या करतात. जमिनी वखरून बियाणे झाकले जाते. साधारणतः एका महिन्यानंतर उगविलेल्या धान रोपांमध्ये हलके नांगरण केल्या जाते याप्रकारे जमिनीची मशागत करून धान पिकास फुटवे फुटण्यास व तण नियंत्रणासाठी मदत होते. सदर पद्धतीला स्थानिक भाषेत बासी म्हणतात . पुर्व विदर्भात वैनगंगेच्या खोऱ्यात हि पद्धत प्रचलीत आहे. परंतु यामध्ये कमी उगवण क्षमता, रोपातील असमान अंतर, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन, काढणीसारख्या बाबीमुळे धानाची उत्पादकता कमी दिसून आलेली आहे.

तर रोवणी पद्धतीत चिखलणी, धानाची रोपवाटिका तयार करणे, जगवणे, रोपांची वाहतूक करणे व पुर्नलागवड (रोवणी) करणे या कामाकरिता धान उत्पादनाच्या ३० ते ३५ % खर्च होतोच परंतु या सर्व कामांसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते. सध्या मजुरांची वेळेवर उपलब्धता हा शेतीतीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील ज्वलंत प्रश्न आहे. परिणामी रोवणीला उशीर होऊन पिकावर कीड व रोगाचे प्रमाण जास्त होऊन धान उत्पादनात २० ते ३० % घट आल्याचे अनेक प्रयोगामधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पद्धती मध्ये तसेच कापणी, तन काढणी ई. कामाकरिता सुधारित यंत्र चा वापर करून खर्च मध्ये मोट्या प्रमाणात बचत होते.

I. पेरणी व रोहणी उपयुक्त यंत्र व अवजारे

१) पेरिव आवत्या (पेरणी पद्धत)
पेरीव धान पद्धतीचे महत्व
बदलत्या हवामानानुसार जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन
निविष्ठांचा कार्यक्षम वापर (वेळेवर व योग्य मात्रेत खते-बीयाणे पेरणी)
वेळेवर शेती कामाची पूर्तता,
उत्पादन खर्चात घट,
शेतीतील कष्ट कमी करणे
पेराणीसोबतच खत देण्याचीही व्यवस्था
यंत्र केवळ धानासाठीच नसून याद्वारे गहू, तीळ, जवस, लाखोरी व चना यांची सुद्धा पेरणी करता येते
नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे हा होय

तिफण किंवा पेरणी यंत्र:- पेरणी शक्यतो तिफनीने किंवा ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राद्वारे करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर २० से.मी. व दोन रोपातील अंतर हे १० ते १५ से. मी. ठेवावे. बियाणे २ ते ४ से.मी. खोल पडेल या बेताने तिफन किंवा पेरणी यंत्र चालवावे. पेरणीसाठी ठोकळ धान ७५ किलो व बारीक़ धान ५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
ड्रम सिडर: आपत्कालीन पिक नियोजन पेरणीसाठी याचा वापर करू शकतो. भात संशोधन संचालनालय, हैद्राबाद यांनी विकसित केलेल्या या ड्रम सीडरद्वारे मोड आलेले बियाणे पेरता येते. यामध्ये दोन ओळीतील अंतर २०x२० से.मी.तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ से.मी. पर्यंत ठेवता येते. चिखलणी केलेल्या समांतर शेतात याचा वापर करता येतो. या पद्धतीत हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे लागते व मजुरीवरील खर्च कमी होतो. मात्र या पद्धतीत धान पिक लागवडीस काही मर्यादा आहेत.
जमीन चिखलणीसाठी आवश्यक पाऊसाची गरज आहे. चिखलणीनंतर सपाट चिखलणीवर पेरणी करावी लागते.
पेरणी करतांना बांधीमध्ये चिखलणीवर पाणी भरलेले असू नये.
पेरणीनंतर एक आठवडा २ ते ३ से.मी. पाणी धान बांधीत असणे गरजेचे असते.
भात बांधीतील तण नियंत्रण वरचेवर करणे आवश्यक आहे. कधी कधी पक्ष्यांचा त्रास संभवतो.

धानची पेरणी पद्धत (डीएसआर) :-धान पेरणीकरीता लुधियाणा येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राला ११ दाते असून दोन ओळीतील अंतर २५ x ३० से.मी.तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ से.मी. पर्यंत ठेवता येते.धान बियाण्याची पेरणी २ ते ४ से.मी. खोल पडेल या बेताने करावी.याची रचना पेरणी यंत्रासारखी असून पेरणीसोबतच खत देण्याचीही व्यवस्था आहे.यामुळे चिखलणी, धानाची रोपवाटिका तयार करणे, जगवणे, रोपांची वाहतूक करणे व पुर्नलागवड (रोवणी) करणे इत्यादी सारखे वेळखाऊ कामे करण्याची आवश्यकता राहत नाही, परीणामी खर्चात बचत होते.एका तासात एक ते दीड याप्रमाणे दिवसभरात ८ ते १० एकर पेरणी करणे सहज शक्य होते. बियाण्यांची जवळपास २० ते२५ किलो प्रती हेक्टरी बचत होते. दोन ओळीतील अंतर २५ x ३० से.मी पर्यंत असल्याने यामध्ये हवा खेळती राहून पिकाची वाढ चांगली होते तसेच आंतरमशागत व कापणी करीता अवजारांचा सहज वापर करता येतो.

धानची पेरणी पद्धत (डीएसआर) करतांना घ्यावयाची काळजी

१.जून महिन्यात पूर्व मशागतिनंतर एकूण ८० ते १०० मी.मी. पाउस झाल्यावर या पद्धतीने पेरणी करावी.
२.पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करुन घ्यावी.
३.पेरणीसाठी ठोकळ धान ७५ किलो व बारीक़ धान ५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे तसेच यामध्ये बियाणीची कमी जास्त प्रमाण करू शकतो.
४.धान लागवडीच्या या पद्धतीमधे लागवड खर्च कमी असून उत्पन्न चांगले आहे. धान १० ते १५ दिवस अगोदर कापणीला येत असल्यामुळे रबी पिकाची लागवड वेळेत होउन, ओलाव्याचा फायदा घेता येतो.
५.रोवणी लागवड पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीमधे नफा, लागवड खर्च गुणोत्तर हे शास्त्रीय दृष्टया जास्त आढळून आलेले आहे.

धानची पेरणी पद्धतचे (डीएसआर) फायदे

१.डीएसआरमध्ये नर्सरीची कोणतीही तयारी किंवा प्रत्यारोपण होत नाही आणि बियाणे थेट ट्रॅक्टरद्वारे चालविलेल्या मशीनद्वारे शेतात पेरले जाते.
२.पाण्याची बचत कारण डीएसआर अंतर्गत प्रथम सिंचन (पेरणीपूर्वीचा पाऊस वगळता) पेरणीच्या 21 दिवसानंतरच आवश्यक आहे.
३.डीएसआर पेरणी पद्धत मध्ये मजुरीची लागत नाही.
४.डीएसआर पेरणी पद्धतमध्ये कोणत्याही नर्सरीची आवशक्ता नाही.
५.डीएसआर पेरणी पद्धतमध्ये चिखल करण्याची गरज नाही व त्यामुळे रब्बी मध्ये जमीन कडकपन्ना येत नाही.
६.वेळेत पेरणी होऊन खर्चात बचत होते.

धानची पेरणी यंत्र (डीएसआर) धान पेरणीकरीता लुधियाणा येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. पेरणी यंत्रास जमिनीवर चालणाऱ्या चाकाद्वारा गती दिली जाते.
१. या यंत्राला ९ आणि ११ दातेचे यंत्र उपलबद्ध आहे तसेच या मध्ये गरजेनुसार आपण अंतर कमी जास्त करू शकतो. यामुळे धानतील दोन ओली मधील अंतर समान ठेवल्या जाते तसेच या यंत्राचा वापर रब्बी पीक पेरणी मध्ये शून्य मशागत यंत्र म्हणून करता येतो कारण फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे याचे खालील फाळ तीक्ष्ण असून जमीन फोडणे सहज शक्य होते.
२. सदर यंत्र मध्ये बियाणे आणि खताची पेटी विविध कप्प्यासह उपलबद्ध आहे. यामध्ये फोटो मध्ये दाखल्याप्रमाणे या प्लेट मध्ये एक वेळेला दोन किवा तीन दाणे एक वेळेस जमीनीत पेरली जातात यामुळे दोन बियाणीचे अंतर समान ठेवल्या जाते. तसेच यामध्ये धान व आणि सर्व बियाणे (सोयाबीन, हरभरा, मका, तूर, कापूस व ई.) करिता वेगवेगळ्या प्लेट दिल्या आहे.
३. सदर बियाण्याचे प्रमाण कमी जास्त करण्याकरिता यंत्राचा डावीभागाकडे लोखंडी पट्टी दिली आहे. फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे आपण शिफारशी प्रमाणे बियाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.

३. तसेच खताची पेटी विविध कप्प्यासह आहे यामध्ये सुद्धा फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे हँडल च्या सहाय्याने शिफारशी प्रमाणे खताचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. ४. खोली चक्र (Depth Wheel) सदर यंत्रमध्ये बियाणे विशिष्ठ खोलीवर पेरणी करिता खोली चक्र (Depth Wheel) दिले आहे या चक्र चा उपयोग मुले बियाणे समान अंतरावर जमिनीत सोडल्या जाते तसेच यामध्ये खोली कमी जास्त करता येते

धान रोवणी यंत्र

१. मानवचलीत रोवणी यंत्र, २. स्वयंचलित लागवड मशीन.
१. मानवचलीत रोवणी यंत्र : मानवचलीत यंत्र मानवाद्वारे चालविल्या जाते. या यंत्राचा आकार छोटा असून याचे वजन सुध्दा कमी असते, जेणे करून एक मनुष्य या यंत्राला चिखलामध्ये ओढू शकेल. या यंत्राला खाली फ्लोटिंग प्लेट दिलेला असून त्यांच्यावर ट्रे रोवणी करिता दिला असतो. ट्रे च्या खालच्या बाजूला दोन फिंगर दिलेले असून त्याद्वारे रोपे उचलून चिखलामध्ये रोवली जातात. या फिंगर ला चैनद्वारे चालविले जाते. तसेच यंत्राला चैनद्वारेच पुढे ओढल्या जाते. ही चैन फिरविण्यासाठी एक हॅन्डल दिलेला असून तो ऑपरेटरनी एका हातांनी फिरवायचा असतो. तर दुसऱ्या हातांनी यंत्र बॅलेन्स करायचा असतो. हे यंत्र चालवितांना ऑपरेटरला उलट्या दिशेने चालावे लागते. हे यंत्र मनुष्य चलीत असल्यामुळे अर्थातच या यंत्राची कार्यक्षमता कमी असते, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कमी शेती आहे आणि जे स्वतःच शेतीमध्ये कार्य करतात अश्या शेतकऱ्यांकरीता हे यंत्र उपयुक्त ठरू शकते आणि NRRI विकसित चार ओढी मानवचलीत रोवणी यंत्र 20-25 दिवस जुन्या मॅट च्या धान रोपांच्या पुनर्लावणीसाठी योग्य आहे. ओळी ते ओळी अंतर 24 सें.मी. त्याची क्षेत्र क्षमता ०.०१८-०.०२० हेक्टर प्रति तास आहे. हे 30-40% मजुरांची गरज आणि 40% प्रत्यारोपणाच्या खर्चात बचत करते.

२.स्वयंचलित लागवड मशीन.
स्वयंचलित लागवड मशीन यंत्रामध्ये खालील दोन प्रकारे मशीन आहेत.
अ.राईडींग टाईप रोवणी यंत्र
ब.वाकिंग टाईप रोवणी यंत्र
रोवणी करण्यासाठी मुख्य शेतीची तयारी करणे
धान रोवणी यंत्राच्या सहाय्याने भात रोपांची रोवणी करण्यासाठी मुख्य षेतीची योग्य प्रकारे मषागत करणे आवष्यकत आहे. षेत माती ढेकळे व काडीकचरा हिरहीत असावी. पूर्ण कार्यक्षमतेने रोवणी यंत्राचा वापर होण्यासाठी चिखलणी ही उथळ 10 सेंमी ते 15 सेंमी पर्यंत असावी.
मुख्य शेतात रोवणीसाठी तयार झाल्यानंतर, रोपवाटीकेतील साठविलेले पाण्याचा निचरा 6 ते 12 तास रोवणी करण्यापूर्वी करावा. हळूवारपणे रोपांचे केक उचलून भात रोवणी यंत्राच्या रोपे ठेवण्यासाठी असलेल्या कप्प्यामध्ये ठेवावेत. रोपांची उचल केल्यानंतर त्याच दिवषी रोपांची रोवणी करणे आवष्यक आहे.

धान रोवणी यंत्राव्दारे रोवणी करतांना घ्यावयाची काळजी

•रोपवाटीकेची जागा समपातळीत करावी.
•रोपवाटीका दगड, गोटे विरहीत असावी व रोपवाटीकेची उंची 2 सेंमी पेक्षा जास्त असू नये.
•रोपवाटीका कधीही कोरडी पडू देऊ नये.
•रोपवाटीकेमध्ये युरिया खताची फवारणी कधीही करू नये.
•चिखलणी उथळ असावी 10 ते 15 सेंमी पर्यंत.
•रोपे रोवणी यंत्राच्या सहाय्याने सुटसुटीत रोवणीसाठी यंत्रावर रोपे ठेवल्यानंतर पाणी षिंपडावे.
•रोपवापटीकेतील रोपांची जास्त वाढ होऊ देवू नये.
•रोपवाटीकेच्या फ्रेममध्ये अती दाट किंवा अती विरळ बियाणे टाकू नये.
•पहिल्या 3 दिवसानंतर रोवाटीकेमध्ये पाण्याची पातळी कायम ठेवावी.
•रोवणी करीता 16 ते 20 दिवसांचीच रोपे वापरावीत.
•रोवणीपूर्वी 1 दिवस चिखलणी करावी.
•रोपांची वाहतुक करतांना बेड तुटणार नाही यााची काळजी घ्यावी.

अ.राईडींग टाईप रोवणी यंत्र

राईडींग टाईप रोवणी यंत्रामध्ये ऑपरेटरला हे बसून चालविण्याकरीता सुविधा उपलब्ध करून दिलेली असते. यामध्ये इंजीन पुढील भागात दिलेले असुन त्यामागे यंत्राला दिशा देण्यासाठी स्टिअरींग व्हील व त्यामागे ऑपरेटरला बसून चालविण्यासाठी सिट दिलेली असते. सिटखाली गाईडींग व्हील असून ते स्टिअरींगद्वारे नियंत्रीत होते तसेच समोरच्या चाकाला पॉवर दिलेली असते. सिटच्या मागे रोपे ठेवण्यासाठी लागणारा ट्रे असून त्याला फ्लोटवर स्थापीत केलेले असते. ट्रेच्या खालच्या बाजूला फींगर दिलेले असुन प्रत्येक ट्रेसाठी दोन फींगर दिलेले असतात ज्याद्वारे ट्रे मधील रोपे उक्तुर चिखलात रोवली जातात. सदर यंत्रामध्ये ८ ओळीमध्ये रोवणी करणारे यंत्र हे मी शेतकऱ्यांमध्ये प्रचलीत आहे. या यंत्राद्वारे एका वेळेस ८ या ओळीमध्ये सारख्या अंतरावर एकसारखी रोवणी करणे शक्य ची आहे. या यंत्राद्वारे रोवणी करण्यासाठी मॅट टाईप नर्सरीद्वारे रोपे तयार करणे गरजेचे असते. यंत्राची ला ०.७५ लीटर प्रती तास डिझेल लागते तर कार्यक्षमता ही २-२.५ प्रती दिन एवढी आहे.

ब.वाकींग टाईप रोवणी यंत्र

वाकींग टाईप या रोवणी यंत्रामध्ये ऑपरेटरला यंत्रामागे चालावे लागते आणि यंत्राला वेगवेगळ्या नियंत्रण प्रणालीद्वारे नियंत्रीत करावे लागते. या यंत्रामध्ये पुढील भागात इंजीन दिलेला आहे. फ्लोट वर स्थापीत केलेले असून इंजीनच्या मागे गेअर बॉक्स तसेच दोन्ही बाजूला दोन चाके दिलेली असतात. यंत्रातील मागच्या भागात रोपे ठेवण्यासाठी ट्रे व फिंगर मेकॅनिजम तसेच यंत्र नियंत्रीत करण्यासाठी हँडल दिलेला असतो. रोपे ठेवणारे ट्रे फ्लोटच्या वर स्थापीत केलेले असतात. ट्रेच्या खालच्या बाजूला फिंगर दिलेले असतात. ज्याद्वारे ट्रे मधील रोपे उचलुन चिखलात रोवली जातात, जास्तीची रोपे ठेवण्यासाठी ईंजीनच्या वर वेगळा ट्रे माऊंट केलेला असतो. रोपे ठेवणाऱ्या ट्रेच्या मागे हॅन्डल दिलेला असून त्यावर यंत्र नियंत्रीत करण्यासाठी कंट्रोल्स दिलेले असतात. हेच हॅन्डल पकडून ऑपरेटरला यंत्राचे नियंत्रण करायचे असते. यामध्ये यंत्राला खाली वर तसचे पुढे आणि मागे घेता येते त्याच प्रमाणे सदर यंत्र एक शेतातून दुसऱ्या शेतात नेणे सोपे जाते. या यंत्राद्वारे चार ओळीमध्ये रोवणी होत असून दोन ओळीमधील अंतर हे ३० सेमी असते तर दान ओढी मधील अंतर १६ ते २२ सेनो असे वेगवेगळे यंत्राप्रमाणे असते. या यंत्राची कार्यक्षमता ही ०.२२ ते ०.५२ एकर प्रती तास असते.
वरील दोन्ही यंत्रा ला मॅट आवश्यक आहे व त्या करिता खालील प्रमाणे तयार करावी

मॅट नर्सरी

१. धान रोवणी यंत्राच्या सहाय्याने भाताची रोवणी करण्यासाठी एक एकर क्षेत्रामध्ये 1.2 मीटर रूंदीचे व 10 मीटर लांबीच्या दोन बेडची आवष्यकता आहे. बेडची उंची 15 सेमी ठेवावी.
२. योग्य लागवडीसाठी रोपवाटीकेची जागा समपातळीत असावी. जेणेकरून बेडची जाडी एकसमान राहील. दोन बेडमध्ये चर तयार करावा, जेणेकरून त्यामधून पाण्याचा निचरा होईल. साधारपणे बेड तयार करण्याच्या जागेवर कंपोश्ट खत किंवा गांडूळखत मातीमध्ये मिश्रण 13 या प्रमाणात घ्यावे.
३. समपातळीत तयार केलेल्या बेडवर पॉलीथीन षिट अंथरून घ्यावा. नंतर बेडवर २१ सेमी ५५ सेमी २ सेमी आकाराची फ्रेम रोपांचे केक तयार करण्यासाठी वापरावी. फ्रेम मातीच्या मिश्रणाने फ्रेम काठोकाठ भरून घ्यावे. फ्रेमच्या वापरामुळे बियाणे वाया जात नाही. रोवणी यंत्रासाठी आवश्यकता असलेले केक तयार होतात. कसमान केकची उंची २ सेमी उंची राखली जाते व नंतर फ्रेम अलगत काढुन घ्यावी. जर केकची उंची २ सेमी पेक्षा जास्त असेल तर रोवणी योग्य पध्दतीने होत नाही. बियाण्यांच्या वाणाच्या प्रकारानुसार अंकुर आलेले बियाणे १२० ग्रॅम ते १५ ग्रॅम प्रति केक या प्रमाणात एकसमान प्रसरन घ्यावेत. अंकुर आलेले बियाण्याची काळजीपूर्वक हाताळणी करावी, जेणेकरून बियाणेची नाजूक मुळे तुटू नयेत. अशा रितीने एक केक तयार झाल्यानंतर एकापाठोपाठ एक या प्रमाणे पूर्ण बेड भरेपर्यंत केक तयार करण्यात यावेत. नंतर बेड हिरव्या पानांनी किंवा भात तूसाच्या सहाय्याने झाकण्यात यावे, जेणे करून पक्ष्यांपासून व पावसापासून बियाणेचे रक्षण होईल.
४. हवामानातील तापमानानूसार दिवसातून २ ते ३ वेळा बेडवर झारीच्या सहाय्याने ३ ते ४ दिवस पाणी द्यावे. बेड कधीही कोरडा पडू देऊ नये.
५. चैथ्या दिवसी रोपांची चांगली वाढ हेात असल्याबाबत पडाताळणी करावी व रोपवाटीका हिरवी दिसत असल्याची खात्री करावी. २ ते २.५ सेमीची रोपे दिसायला सुरूवात होईल. नंतर भाताचे तुस काढून घ्यावे व रोपवाटीकेमध्ये २ सेमी उंची पर्यंत पाण्याची पातळी ही रोपांच्या उंचीच्या निम्यापर्यंत ठेवावी.
६. रोपवाटीकेवर बारकाईने लक्ष ठेवावे. किड व रोगांची प्रादुर्भाव दिसून आल्यास तात्काळ नियंत्रणाचे उपाय करावेत.
७. अंकुर आलेले बियाणे रोपवाटीकेमध्ये टाकल्यापासून १७ ते १८ दिवसापर्यंत १२.५ ते १५ सेंमी उंची असलेले रोपे तयार होतील. ३ ते ४ पाने असलेली रोपे रोवणी यंत्राच्या सहाय्याने रोवणीसाठी योग्य आहेत असे समजावे. रोपवाटीकेमध्ये रोपांची जास्त दिवस वाढ होवू देवू नये. जाड व टणक अशी मॅट मधील मुळे रोवणी यंत्राच्या बोटांना रोवणी करणे सोईस्कर होत नाहीत.

II. तन काढणी यंत्र

१. कोनो वीडर - हे दोन ओढी मधील गवत काढणी करिता यंत्राचा वापर करतात. हे मानवचलीत पुल आणि पुश प्रकारचे तणकाढणी यंत्र आहे. तण यंत्र मध्ये एक चौकट, चाक, एक हँडल आणि पाच वक्र बोटे असतात. बोटांमधील अंतर समायोज्य आहे. ऑपरेटर हँडल इकडे-तिकडे हलवताना बोटांनी जमिनीत ढकलले आणि ते सोडवले आणि तण उपटून टाकले. या उपकरणाची क्षेत्र क्षमता ०.०२२-०.०२५ हेक्टर प्रति तास आहे.
२. पॉवर रोटरी वीडर - हे यंत्र ८.३८hp डिझेल इंजिन तणकाढणी यंत्र आहे. इंजिनची शक्ती व्ही बेल्ट-पुलीद्वारे जमिनीच्या चाकांवर प्रसारित केली जाते. ऑपरेटिंग डेप्थ राखण्यासाठी मागील बाजूस एक टेल व्हील प्रदान केले आहे. रोटरी खुरपणी जोडणीद्वारे तण काढले जाते. रोटरी वीडरमध्ये डिस्कच्या तीन पंक्ती असतात ज्यामध्ये प्रत्येक डिस्कमध्ये वैकल्पिकरित्या विरुद्ध दिशेने ६ क्रमांकाच्या वक्र ब्लेड असतात. हे ब्लेड फिरवताना माती कापण्यास आणि आच्छादन करण्यास सक्षम करतात. रोटरी टिलरच्या कव्हरेजची रुंदी ५०० मिमी आहे आणि ऑपरेशनची खोली पीक केलेल्या शेतातील माती तण आणि आच्छादनासाठी समायोजित केली जाऊ शकते.

III. धान (भात) कापणी यंत्र

१) स्वयंचलित धान कापणी यंत्र (रीपर) - धान कापणीसाठी उपलब्ध असून, या यंत्राद्वारे धान पिकाची कापणी करताना पीक व्यवस्थितपणे जमिनीलगत कापले जाते, तसेच कापलेले पीक एक सरळ रेषेत यंत्राच्या उजव्या बाजूला अंथरले जाते आणि अशा प्रकारे सरळ पट्ट्यात अंथरलेल्या पिकाच्या पेंढ्या बांधण्याचे काम मजुरांकरवी सुलभपणे होऊ शकते. इंजिन ऑपरेटेड रीपर ५-६hp च्या इंजिनने चालवता येते.
यंत्राची वैशिष्ट्ये
१) धान पेरताना सरळ रेषेत पेरले नसेल किंवा फेकून पेरलेले असेल तरीसुद्धा व्यवस्थित कापणी करता येते.
२) सव्वा ते दीड हेक्‍टर क्षेत्र एका दिवसात कापून होते.
३) धान कापणीच्या खर्चात, श्रमात तसेच वेळेचीही बचत होते.
४) कापणी यंत्राने भातची कापणी केली असता पिकाच्या नुकसानीचे प्रमाण कमी होते जे पारंपरिक पद्धतीत खूप आढळून येते.

२) स्वयंचलित कापणी व बांधणी यंत्र (रीपर बाईंडर)

धान, गहू आणि, इतर तेलबिया आणि कडधान्य पिकांची कापणी आणि बंडल तयार करण्यासाठी हे यंत्र वापर करतात. सदर यंत्र ९ किलोवॅट डिझेल इंजिनद्वारे स्वयंचलित पद्धतीवर चालवले जाते तसेच यामध्ये एकूण ४ चाकी दिल्या जातात यामध्ये पुढील दोन ड्रायव्हिंग चाके ज्यामध्ये मोठे टायर आहेत आणि मागील बाजूस ऑटोमोटिव्ह टायर असलेली दोन स्टीयरिंग व्हील आहेत.
कापणी प्रणालीमध्ये क्रॉप रो डिव्हायडर, स्टार व्हील, कटर बार, उभ्या कन्व्हेयर बेल्ट आणि वायर स्प्रिंग्स यांचा समावेश होतो. प्रभावी कटर बारची रुंदी १.२ मीटर आहे. क्रॉप रो डिव्हायडर उभ्या पिकात कापल्यानंतर किंचित उचलण्यात मदत करतात आणि कन्व्हेयर बेल्टद्वारे पोहोचतात. सर्व कापलेले पीक मशीनच्या मध्यभागी पोहोचवतात आणि एका प्लॅटफॉर्मवर परत जातात जिथे ते प्रत्येकी ५ किलोचे बंडल बनवतात. शेवटी, पीक मागील बाजूस जमिनीवर सोडले जाते. रीपर बाईंडरची कार्य क्षमता ०.३-०.४ हेक्टर/तास आहे.

३) ट्रॅक्टरचलित कापणी यंत्र

हे यंत्र ट्रॅक्टर पीटीओ ऑपरेटेड असून या मशीनमध्ये १.५ मीटर लांबीचा कटर बार असतो, ज्याला ट्रॅक्टरच्या पीटीओकडून ड्राइव्ह दिले जाते. वरील ट्रॅक्टर चलित मध्ये दोन प्रकार आहेत एक तर कटर बार ट्रॅक्टर च्या साइडने असतो आणि दूसरा म्हणजे कटर बार ट्रॅक्टर च्या समोर असतो. कापलेले पीक एक सरळ रेषेत यंत्राच्या उजव्या बाजूला अंथरले जाते आणि अशा प्रकारे सरळ पट्ट्यात अंथरलेल्या पिकाच्या पेंढ्या बांधण्याचे काम मजुरांकरवी सुलभपणे होऊ शकते. हे ८५% च्या फील्ड कार्यक्षमतेसह सुमारे ३ हेक्टर/दिवस कापू शकते.

IV. कम्बाईन हार्वेस्टर

तकरी त्यांच्या शेतात नियमितपणे विविध प्रकारचे धान्य पिकवतात त्यांच्यासाठी कापणीचा हंगाम खूप महत्त्वाचा असतो. कम्बाईन हार्वेस्टर हे एक बहुउपयोगी व प्रगत असे कृषी उपकरण आहे. हे उपकरण धान, गहू, हरभरा, सोयाबीन,सूर्यफूल,मुगाची कापणी व मळणी करण्यासाठी वापर करण्यात येतो .या मशीनचा वापर केल्यामुळे लागणारे श्रम कमी होते तसेच वेळेत आणि खर्चात ही बचत होते. कम्बाईन हार्वेस्टर हे खालील प्रमाणे काम करते. विविध कंपन्यांची हार्वेस्टर मशीन उपलब्ध आहेत. यात्रांमध्ये २ ते ६ मीटर लांब कटर बार असतात. या मशीनच्या साहाय्याने पिकांची कापणी, धन्या ची सफाई केली जाते. कम्बाईन हार्वेस्टर मशीन रील हा उभ्या पिकाला मशीनमधील कापण्यासाठी उपयुक्त युनिट्स जवळ पोहोचवण्याचे काम करतो. त्यानंतर मशीनमध्ये असलेल्या कटर बारला जोडलेले चाकूमुळे पिकांची कापणी होते. त्यानंतर धान्य हे कन्व्हेअर बेल्टद्वारे रेसिंग युनिटपर्यंत पोहोचवले जाते. येथे धान्याचे धरणे हे ड्रसिंग ड्रम आणि काँक्रीट क्लिअरन्स रगडले जाऊन वेगळे केले जाते. त्यानंतर मशीनला असलेल्या गळणीमध्ये धान्य साफ केले जाते. कम्बाईन हार्वेस्टर मशीनमध्ये एक स्टोन ट्रॅप युनिट बसवलेले असते. ज्याद्वारे धान्यामध्ये आलेले माती, दगड, बारीक खडे वेगळे केले जातात.

कापणी: कापणी ही वनस्पती कापण्याची प्रक्रिया आहे, जी हेडर, रील आणि कंबाइनवरील कटर बारद्वारे पूर्ण केली जाते. शीर्षलेख पिके गोळा करतो तर रील त्यांना कटर बारकडे ढकलतो, ज्यामुळे पिके त्यांच्या पायथ्याशी कापतात.
मळणी: मळणी ही पिकाच्या खाण्यायोग्य भागांना अखाद्य भागांपासून वेगळे करण्याची प्रक्रिया आहे. हे मळणी ड्रमद्वारे पूर्ण केले जाते, जे कापलेल्या पिकांना त्यांच्या देठापासून धान्य वेगळे करण्यासाठी मारते.
विनोइंग: विनोईंग ही धान्यापासून हलका भुसा वेगळा करण्याची प्रक्रिया आहे आणि ती सहसा धान्य मळणीच्या ड्रममध्ये असताना पूर्ण केली जाते. चाळणीच्या सहाय्याने चाफ सामान्यतः धान्यापासून वेगळा केला जातो. कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे प्रकार कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे तीन प्रकार आहेत.

स्वयंचलित कम्बाईनहार्वेस्टर
१)ट्रॅक्‍टरचलित कम्बाईन हार्वेस्टर
२)स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर
३)ट्रॅक टाइप कम्बाइन हार्वेस्टर्स

१) ट्रॅक्‍टरचलित कम्बाईन हार्वेस्टर
याप्रकारच्या कंबाईन हार्वेस्टर मशीनला ट्रॅक्टरसोबत जोडून चालवले जाते. ह्या प्रकारच्या हार्वेस्टर हे ट्रॅक्टरला असलेल्या पी टी ओ मुळे चालते. ट्रॅक्टरला कम्बाईन जोडून पिकांची कापणी केली जाते.

२)स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर
याप्रकारच्या हार्वेस्टरमध्ये सर्व प्रकारची मशिनरी फिट असते. मशिनरी आपल्या शक्तीने इंजिन आणि इतर मशीनच्या भागांना संचालित करते. त्यामुळे ती काढणी, कापणी तसेच सफाईचे काम सुलभतेने होते.

३)ट्रॅक टाइप कम्बाइन हार्वेस्टर्स
ट्रॅक कंबाईन हार्वेस्टर हे कापणी यंत्र आहेत जे चाकांऐवजी ट्रॅकच्या मदतीने बसवले जातात.त्यांच्याकडे उच्च ग्राउंड क्लीयरन्स आणि टिकाऊ ड्रायव्हर्स, हेवी-ड्युटी चेसिस आणि इटन पंप असलेली उच्च टिकाऊ रचना आहे. ज्यामुळे चाकांवर आधारित कापणी करणारे अडकून पडतील अशा पाणथळ प्रदेशातही कामगिरी करण्यासाठी ते आदर्श बनवते. त्याच प्रमाणे हे यंत्र अलीकडे धान पिक करीत उपउक्त होत आहे कारण कंपनीवेळेस शेतात ओलावा किवा पानी असते यामुळे हे यंत्र उपउक्त ठरते.

पिक अवशेष जमा करण्याचे यंत्र (रेकर) आणि चौरस पेंढी बांधणारे यंत्र (Baler Machine)
जवळपास पिकाची कापणी आता कंम्बाइन हाऱ्वेस्टर या यांत्राने करतात. कंम्बाइन हाऱ्वेस्टर ने पिकाची कापणी केला नंतर शेतात पिक अवशेष विखूरल्या जाते, तर आता पडले ले पिक अवशेष व्यावस्थित रित्याएकत्रित सरीमध्ये आणन्यसाठी तणीस जमा कारणी यंत्र (Raker Machine) विकसित केले आहे. या यंत्राध्यारे गहू, भात, ऊस आणि मका व इ. पिक अवशेष एका सरीमध्ये जमा होते ही यंत्र ट्रक्टर चलित असून या साठे २५ hp ताकद लागते व हे यंत्र आकाराने गोलाकार असून त्यावर दातऱ्या असतात. या यंत्राने २० फुट मधील पिक अवशेष हे ४-५ फुट सरीमाध्ये जमा करते व या यंत्राची किमत साधारण २ लक्ष एवढे असून एका तासाला जवळ पास ६ एकर पिक अवशेष सरी माध्ये आणते व त्या नंतर चौरस पेंढ्या बद्णारे (Square Baler) यंत्रच्या साह्याने पिक अवशेष ची संकुचीत स्वरुपात चौरस पेंढ्याबांधणी करिता पेंढ्याबांधणी यंत्र विकसित झाले आहे.

V.पिक अवशेष जमाकारणी यंत्र (Raker Machine)

पेंढ्या बांधणी यंत्रद्वारे लहान आणि मोठे चौरस आकारात (१५ ते २५ किलो ) पिक अवशेषच्या पेंढ्या तयार करता येतात. हे यंत्र ट्रॅक्टर चालत असून हिचींग पॅाइंट हा ट्रॅक्टरला व मशीनचा शाफ्ट हा ट्रॅक्टर PTO ला जोडलेला असतो. शेतात यंत्र चालत असतांनी जमिनीवर पडलेले पिक अवशेष संकलन विभागाच्या दांत्याळाला सहायाने मुळे कॉम्प्रेसर चेंबरकडे पाठवल्या जाते. आत चेम्बर मध्ये ७ इंची ६ ते ८ पट्टे (बेल्ट) लावलेले असतात या मध्ये ६०० ते ८०० प्रती मिनिट ने पिक अवशेष वर मारा केल्या जातो या बेल्टद्वारे पिक अवशेष चौरस स्वरुपात केल्या जात असून त्यापासून पेंढी तयार होते. आत चेम्बरमध्ये पेंढी तयार झाल्या नंतर मागील चेम्बर बाहेर पडते. या क्रियेला ३० ते ४५ सेकंद येवढा कालावधी लागतो व या यंत्रद्वारे तयार झालेल्या पेंढी चे वजन साधारण २५ किलो असनू एक तासाला २.५ एकरामध्ये ९० ते १०० पेंढ्या तयार करतो व या यंत्र ची किमत साधारण ९ लक्ष आहे.

वैशिष्ट

१)या यंत्राचा सहायाने गहू, भात, ऊस, कापूस, ज्वारी आणि मक्का इत्यादी. पिक अवशेषच्या पेंढ्या बदल्या येतात.
२)या पेढ्याचा उपयोग जनावराचा चारासाठी, बियोमास, पेपर बनवण्यासाठी आणि कोळसा बनवण्यासाठी होतो.
३)जवळपास सर्व शेतकरी पिक अवशेष जाळतात त्यामुळे पर्यावरण विपरीत परिणाम होतो तो या यंत्रद्यारे कमी होऊ शकतो.
४)पिक अवशेष शेतात जाळल्यामुळे होणारे मातीवर विपरीत परिणाम थाबेल.
५)या यंत्राद्यारे तयार केलेल्या पेंढ्या उचलन्यासाठी, वाहूननेन्यासाठी तसेच जमा करण्यासाठी सोपी व कमी खर्चात होते.
६)शेतकरी ना पिक अवशेष पासून सुधा पैसे मिळतील.

लेखक - श्री. ज्ञानेश्वर वि. ताथोड (कृषी अभियांत्रिकी) कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली
डॉ. संदीप शा. कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, गडचिरोली

English Summary: Dhan Sheti Machines and implements useful in paddy farming Published on: 29 January 2024, 12:41 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters