1. यांत्रिकीकरण

चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठाने बनवले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, जाणून घेऊया ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा खर्च हापरवडेनासा झाला आहे. सध्या बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड सुरू झाला असून इलेक्ट्रिक बाइक सुद्धाबाजारात आले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-the logical indian

courtesy-the logical indian

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा खर्च हापरवडेनासा झाला आहे. सध्या बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड सुरू झाला असून इलेक्ट्रिक बाइक सुद्धाबाजारात आले आहेत.

.जर शेतीचा विचार केला तर शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा  चा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. परंतु डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर चा खर्च शेतकऱ्यांना परवडणे योग्य राहिला नाही. परंतु यावर पंजाबमधील एका विद्यापीठाने चांगला पर्याय काढला असून या विद्यापीठातील इंजिनिअरिंग विभागाने इलेक्ट्रिक वर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. हा एक ट्रॅक्टर डिझेल इंजिन इतकाच कार्यक्षम असून त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन नुकसान कमी होणार आहे. चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी  आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने हे मॉडेल विकसित केले आहे. भारतातील विद्यापीठातील ई ट्रॅक्टर वरील हे पहिलेच संशोधन आहे.

 ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये

  • हे ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर16.2 KWh क्षमता असलेल्या लिथियम आयन बॅटरीने चालते.
  • यामध्ये 12KW ची इलेक्ट्रिक बृष्लेस डीसी मोटर आहे.  जी 72Vवर चालते.
  • या ट्रॅक्टरची बॅटरी नऊ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
  • या ट्रॅक्टरची बॅटरी चार्ज करण्यासाठी 19 ते 20 युनिट वीज लागते. त्यामध्ये जलद चार्जिंगचा पर्याय देखील देण्यात आला आहे यासाठी फक्त चार तास लागतात.
  • या ट्रॅक्टर एकदा चार्ज केल्यानंतर 80 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो.
  • या ट्रॅक्टरला एकदा चार्ज केल्यानंतर दीड टन ट्रेलर्ससह80 किमी पर्यंत जाऊ शकतो.
  • या ट्रॅक्टरचा जास्तीत जास्त वेग 23.17 किमी प्रतितास आहे.
  • हा ट्रॅक्टर 770 किलो वजन उचलण्यास सक्षम आहे.
  • या ट्रॅक्टरच्या वापराने डिझेल इंजिन च्या तुलनेत प्रति तास 15 ते 25 टक्के पैशांची बचत होऊ शकते.
  • या ट्रॅक्‍टरची किंमत सध्या साडेसहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • हे ट्रॅक्टर सध्या बाजारात आले नसून फक्त त्याचा प्रोटोटाइप तयार करण्यात आला आहे.(संदर्भ-पुढारी)
English Summary: choudhry charansing hariyana agri university make electric tractor Published on: 10 January 2022, 09:23 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters