सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे या इंधनावर चालणारे वाहन वापरणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे बर्याच जणांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना पोषक असेच धोरण केंद्र सरकारचे देखील आहे. यामध्ये ट्रॅक्टर चा विचार केला तर ट्रॅक्टर हे शेतीमध्ये अत्यावश्यक असे असणारे यंत्र आहे.डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतीकामासाठी ट्रॅक्टर चा वापर केल्याने उत्पादन खर्चात प्रचंड वाढ होत आहे. या बिकट परिस्थितीत आता एक आनंदाची बातमी आहे. ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर ची निर्मिती करणारी सेलेस्टीयल मोबिलिटी मेक्सिकन कंपनीची देशातील पहिली इलेक्ट्रिक ट्रॅक्टर निर्मिती करणारी कंपनी ठरली आहे. आता हा ट्रॅक्टर भारतातच नव्हे तर मेक्सिकन बाजारात देखील विकला जाणार आहे.
उत्पादनाचा वाढता खर्च आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या या पार्श्वभूमीवर ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर एक मैलाचा दगड ठरणार आहे. हैदराबाद मधील ही कंपनी मेक इन इंडिया च्या माध्यमातून प्रोत्साहन देत इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्यातदेखील करणार आहे. या कंपनीने या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची मार्केटिंग व वितरण करण्यासाठी ग्रुपो मार्वेलसा सोबत देखील करार केला आहे.
या कंपनीच्या माध्यमातून आता या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची मेक्सिकोला निर्यात केली जाणार असून येत्या तीन वर्षांमध्ये चार हजार ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर मेक्सिकन बाजारात विकण्याचे उद्दिष्ट या कंपनीने ठेवले आहे. कारण मेक्सिको कडे अगोदरच 2500 डीलरशिप, 800 अधिकृत सेवा केंद्र आणि 35 वाहन मिनिट्स चे जाळे असल्याने ट्रॅक्टर विक्रीचे लक्ष ठेवले आहे ते साध्य होईल असे सांगण्यात आले.
Share your comments