लागवडीपासून ते काढणीपर्यंतची कृषी यंत्रे; सोपं होईल महिलांचं काम

12 October 2020 04:52 PM


जर शेतकरी कुटुंबाचा विचार केला तर शेतकऱ्यांबरोबर घरातील महिला ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतामध्ये काम करतात. परंतु कृषी यंत्रांचा अभावामुळे महिलांना कामांमध्ये जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात. एका ताशाच्या कामाला जवळजवळ चार ते पाच तास लागतात. अशा परिस्थितीत जर कृषी यंत्रांची मदत महिलांना मिळाली तर त्यांचे कष्ट वाचतील आणि कामही सोपं होईल. यंत्रांच्या मदतीमुळे वेळेची बचत होते आणि होणारे कष्ट कमी कामे जलदगतीने पुर्ण होतील. आपल्या भारताची लोकसंख्या ज्याप्रकारे वाढत आहे, त्या प्रमाणात उत्पादनातही वाढ होणे अपेक्षित आहे. आताच्या परिस्थितीमध्ये महिलावर्गाची शेतीच्या विविध क्षेत्रांमध्ये सहभाग वाढत आहे. त्या दृष्टीने विविध तंत्रांचा वापर करणे ही अपरिहार्य आहे. आपण या लेखात अशाच काही यंत्रांची माहिती घेऊ.

लागवडीसाठी उपयुक्त अशी यंत्र

लागवडीसाठी नवीन डिबलर व पीएयू सीडड्रिल हे यंत्र लागवडीसाठी वापरण्यात येणारे यंत्र आहेत. या यंत्रांच्या सहाय्याने गहू, सोयाबीन, मक्का,  हरभरा इत्यादी आकाराने मोठ्या असलेल्या बियाण्यांची एका रांगेत लागवड करणे सोपे जाते. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यासाठी वाकून काम करायची गरज नाही, सरळ उभे राहून आपण त्यांचा वापर करू शकतो. त्याच्यामुळे महिलांना कामात येणारा थकवा येणार नाही. यासह वेळेतही भरपूर बचत होईल. दुसरे म्हणजे कमी वेळात जास्त क्षेत्रफळात काम होते तसेच एका रांगेत लागवड होत असल्याकारणाने आपण गवत काढण्यासाठी जी का यंत्र वापरतो त्यांचा वापर सुरू होतो.  नडिबलर मशीनची किंमत फक्त ७०० रुपये आहे आणि सीडड्रिल मशीनची किंमत ५०० रुपये आहे. हे यंत्र आपण केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था भोपाल येथून खरेदी करू शकतो किंवा महाराष्ट्रातही मिळू शकते.

 तण नियंत्रणासाठी उपयोगी कृषी यंत्र

महिला शेतकरी पिकांमधील तण काढण्यासाठी सिंगल व्हील हो वीडर  मशीन आणि ट्वीन व्हील हो आणि कॉनो विडर या यंत्राचा वापर करू शकतात. या यंत्रांच्या उपयोगामुळे महिलांना जमिनीवर बसून काम करण्याची आवश्यकता नसते. आरामात उभे राहून काम करता येऊ शकतात. त्याच्यामुळे महिलांमध्ये येणाऱ्या थकव्याचे प्रमाण कमी होते. सिंगल व्हील हो वीदरची किंमत ६०० रुपये आहे आणि ट्वीन व्हील ची किंमत ८०० रुपये आहे.

शेतामध्ये सऱ्या आणि बेड बनवण्यासाठी उपयोगी कृषी यंत्र

शेतामध्ये पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सर यांची आवश्यकता भासते आणि थोड्या उंचीवर पीक लागवड करण्यासाठी बेड आवश्यक असते. त्याच्यासाठी हॅन्ड रिझर या यंत्राचा वापर करणे फायद्याचे असते. हे यंत्र चालवण्यासाठी २ महिलांचे आवश्यकता असते. या यंत्राचा वापर उभा राहून करता येतो. याच्यामुळे महिला शेतकऱ्यांना खाली वाकून काम करण्याची गरज नाही. त्यामुळे महिलांच्या होणाऱ्या श्रम व शक्तीचा अपव्यय टळतो. तसेच त्यांची कार्यक्षमता वाढते. हे मशीन फक्त सातशे रुपये मध्ये मिळते.

 


फवारणीसाठी आवश्यक कृषी यंत्र

पिकांवर फवारणीसाठी फर्टीलायझर ब्रोडकॅस्टर या यंत्राचा वापर करू शकतात. त्याच्या वापरामुळे पिकांवर एक सारख्या प्रमाणात फवारणी करणे शक्य होते. या यंत्रामुळे ही श्रमशक्तीत बचाव होतो आणि दुप्पट वेगात काम होऊ शकते. हे यंत्राची किंमत २, ५०० रुपये आहे.

 पिकांच्या कापणीसाठी उपयोगी कृषी यंत्र

शेतामधील उभ्या पिकांच्या कापणीसाठी महिला शेतकरी इम प्रुड सिकल वापरू शकतात. हे वजनाने फारच हलके असते त्यामुळे महिलांच्या शक्तीत बचत होते आणि कामाचा वेग वाढतो. याची किंमत फक्त ५० रुपये आहे.

बियाण्यांची ग्रेडिंग आणि सफाईसाठी उपयोगी कृषी यंत्र

हिरवे वाटाणे, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, हरभऱ्या इत्यादी मोठ्या आकाराच्या धान्य पिकांच्या ग्रेडिंगसाठी आणि स्वच्छतेसाठी महिला शेतकरी स्पायरल सीड ग्रेंडरचा वापर करू शकतात. या यंत्राची किंमत ३ हजार ते ६,५००  रुपयांपर्यंत आहे. या यंत्राचा वापर करणे फारच सुलभ असते. या यंत्राच्या वापरामुळे धान्यातील काडीकचरा सुलभतेने साफ करता येतो.

Agricultural Machinery women's work कृषी यंत्रे महिलांचे काम
English Summary: Agricultural machinery from planting to harvesting will make women's work easier

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.