देशात कृषी क्षेत्रात रोजच नवनवीन अविष्कार घडत असतात, या नवनवीन शोधामुळे देशातील शेतकऱ्यांना फायदा मिळत असतो. असाच एक शोध देशातील वैज्ञानिकांनी लावला आहे. चौधरी चरण सिंह कृषी विद्यापीठ हरीयाणा येथील वैज्ञानिकांनी मका काढण्याची एक मशीन तयार केली आहे.
मशीनला पैडेल ऑपेरेटेड मेज शेलर मशीन असे संबोधले जात आहे. या मशीनला भारत सरकारच्या पेटेन्ट कार्यालयाकडून डिजाईन पेटेन्ट प्राप्त झाले आहे. विद्यापीठ द्वारा निर्मित हे मशीन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची सिद्ध होणार आहे. ह्या मशीनची किमत हि खुपच कमी आहे त्यामुळे कुठलाही शेतकरी याला सहज खरेदी करू शकतो आणि उपयोग करू शकतो.
मेन्टेनन्स खर्च आहे नगण्य
विद्यापीठातील वैज्ञानीकांच्या मते हे मशीन कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे शिवाय या मशीनला मेन्टेनन्स देखील खुपच कमी आहे त्यामुळे मेन्टेनन्स खर्च हा नगण्य असणार आहे. त्यामुळे याचा उपयोग हा अल्पभूधारक व कमी मकाचे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा ठरणार आहे.
ह्या मशीनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या मशीन पासुन काढले जाणारे मकीचे दाणे हे जास्त खराब होत नाही त्यामुळे ह्या मशीन पासुन काढल्या जाणाऱ्या मकीचा उपयोग हा बिजनिर्मितीसाठी केला जाऊ शकतो. असे सांगितले जात आहे की, या मशीनपासून जवळपास आठ तासात सात क्विंटल मका काढला जाऊ शकतो, यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न हे वाढणार आहे.
याआधी बिजनिर्मितीसाठी मका हा मॅन्युअली काढला जात होता त्यासाठी लेबर खर्च हा अधिक येत होता आणि एक व्यक्ती फक्त आठ तासात 1.60 क्विंटल मका काढू शकत होता. शिवाय यामुळे मक्याचे दाणे अधिक तुटतं होते.
पण ह्या मशीनला चालवण्यासाठी फक्त एका माणसाची गरज पडते आणि याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवीने देखील तुलनेने खुपच सोपे आहे, कारण ह्याचे वजन हे खुप कमी आहे. तसेच हे मशीन विनावीज चालते म्हणजे या मशीनच्या वापरासाठी विजेची गरज भासत नाही त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च वाचतो. हरियाणा कृषी विद्यापीठातील वैज्ञानीकांची हि कामगारी खरंच खुप कौतुकास्पद आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे एवढं नक्की.
Share your comments