1. यांत्रिकीकरण

अवजारे मागणीसाठी ११.८४ लाख अर्ज; ट्रॅक्टर, पॉवर टिलरला शेतकऱ्यांची पसंती

शेतीची कामे किती कष्टाची असतात हे आपल्याला माहिती आहे. यामुळे शेतीमध्ये यंत्रांचा उपयोग अधिकाधिक वापर झाल्यास शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतील आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. दरम्यान कृषी क्षेत्रात यंत्राचा अधिक वापर व्हावा यासाठी, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अवजारे उपलब्ध केली जातात.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
अवजारे मागणीसाठी ११.८४ लाख अर्ज

अवजारे मागणीसाठी ११.८४ लाख अर्ज

शेतीची कामे किती कष्टाची असतात हे आपल्याला माहिती आहे. यामुळे शेतीमध्ये यंत्रांचा उपयोग अधिकाधिक  वापर झाल्यास शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतील आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. दरम्यान कृषी क्षेत्रात यंत्राचा अधिक वापर व्हावा यासाठी, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अवजारे उपलब्ध केली जातात.

पण गेल्या सहा महिन्यांपासून अवजारांचा लाभ शेतकरी घेऊ शकत नव्हते. पण आता परत शेतकऱ्यांतकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत अवजारांचा लाभ देण्यासाठी यंदा तब्बल ६ महिने उशिराने अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र तरीही यंदा राज्यातील ११ लाख ८४ हजार २४३ शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळावे, यासाठी  अर्ज केले आहेत. शेती विकासासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियनांतर्गत कृषी यांत्रिकरण उपअभियानातून शेतकऱ्यांना विविध शेती अवजारांचा लाभ दिला जातो. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्तपणे शेती विकासाला प्राधान्य देत हा उपक्रम राबवला जात आहे.

हेही वाचा : शेतीतील यांत्रिकीकरण वाढण्यास उपयुक्त आहे केंद्र सरकारची योजना

दरम्यान दरवर्षी एप्रिल - मे महिन्यातच या योजनेसाठी अर्ज मागिविले जात असतात. यंदा मात्र कोरोना व्हायरसचा संसर्ग असल्यने डिसेंबरमध्ये अर्ज मागवले.  यावर्षी पहिल्यांदाच कृषी यांत्रिकीकरणाचे अर्ज ऑनलाईन मागवले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६ ते ७ महिने उशिराने अर्ज मागवूनही मागील वर्षाच्या तुलनेत  दुप्पटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी शेती अवजारांची  मागणी केली आहे.त्या तुलनेत यंदा ९९ कोटी ५३ लाख रुपये अनुदानावर खर्च केले जाणार आहेत.

 

अवजारे बँकांची संख्या वाढणार

 दरम्यान शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी विभागाकडून १० लाख व २५ लाख रुपयांच्या तुलनेत अवजारे बँक दिली जाते. यात ४० टक्के अनुदान दिले जाते. राज्यात यावर्षी ३६० अवजारे बँका केल्या जाणार आहेत. त्यात १० लाखांच्या मर्यादेतील ३५० तर २५ लाखांच्या मर्यादेतील  १० अवजारे बँका असतील. त्यासाठी १५ कोटींची तरतूद केलेली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक ६१, पुणे विभागात ६०, नाशिक विभागात ५३ अवजारे बँका असतील

काय आहे शेतकऱ्यांची मागणी

बैलचलित अवजारे - ४१हजार ११८

१० लाखांची अवजारे बँक १९८७

२५ लाखांची अवजारे बँका

 

फलोत्पादनामधील अवजारे

७ हजार ७१३

मनुष्यचलित अवजारे - ५२ हजार ०५७

काढणी पश्चात अवजारे १३ हजार ५७२

पॉवर टिलर - १ लाख १ हजार ३४३

कृषी प्रक्रिया संच  - २२ हजार ४१७

स्वयंचलित अवजारे - २८ हजार ४५८

विशेष शेती अवजारे - ६ हजार ४५७

ट्रॅक्टर - ३ लाख ८७ हजार २८१

ट्रॅक्टर व पॉवर चलित अवजारे  - ५ लाख १२ हजार ८९२.

English Summary: 11.84 lakh applications for farm equipment's ; power tillers preferred by farmers 5 Published on: 08 February 2021, 04:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters