आपण बघतो की सर्वसामान्यपणे शाळेत रविवारची सुट्टी असते. असे असताना आता झारखंडमध्ये शाळांना शुक्रवारची सुट्टी जाहीर केली आहे. असे असताना मुस्लीम लोकसंख्या आणि उर्दू शाळेचा हवाला देत सरकारी शाळेला रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. झारखंडमधील जामतारा या दोन ब्लॉक कर्मतांड आणि नारायणपूरमधील मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सुरू असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी दिली जात आहे.
यामुळे आता याची चर्चा रंगली आहे, यामुळे वाद सुरु होण्याची शक्यता आहे. या शाळांमध्ये मुस्लिमांबरोबरच हिंदू धर्माचे विद्यार्थीही शिकतात. आता त्यावरून गदारोळ झाला आहे. याबाबत शुक्रवारी शाळांना केवळ सुट्टी जाहीर करण्यात आली. शाळेच्या सूचना फलकावरही त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे वादाला सुरुवात झाली आहे.
याबाबत मात्र विभागाचे अधिकारी काहीही उत्तर देत नाहीत, याठिकाणी 15 शाळा उर्दू शाळा म्हणून शासकीय नोंदीत आहेत. आता ग्रामशिक्षण समिती आणि स्थानिक लोकांच्या दबावामुळे डझनभर शाळांमध्ये उर्दू शाळा जबरदस्तीने लिहून रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी Friday holiday दिली जात असल्याचा आरोपही होत आहे. उर्दू शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, असे पत्र शासनाकडून आले होते, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
आता महागाई आणि गॅस भरून आणायची चिंता मिटली! सोलर कुकिंग शेगडी लॉंच
दरम्यान, रांचीचे डीसी फैज अहमद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, प्रकरण काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल. येथील सरकारने गेल्या वर्षी आदेश जारी केला होता की राज्यातील सर्व उर्दू शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी असेल. सरकारी आदेशांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र उर्दू शाळा म्हणून अधिसूचित नसलेल्या त्या भागातील शाळांनाही रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे वातावरण तापले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो भातशेतीत सोडा मासे, आधुनिक तंत्रामुळे शेतकरी कमवत आहेत लाखो रुपये..
RBI गव्हर्नरांचे महागाईबाबत मोठे वक्तव्य, म्हणाले, काही दिवस महागाई..
श्रीलंकेत मोठा उद्रेक, राष्ट्रपती राजपक्षे राष्ट्रपती भवन सोडून पळाले, नातेवाईकांनी 'असा' लुटला देश
Share your comments