1. शिक्षण

दहावीचा निकाल जाहीर, निकालाची टक्केवारी 99.95

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे निकाल तयार करूनहा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
10th class result

10th class result

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे निकाल तयार करूनहा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

.शिक्षण मंडळाचे पत्रकार परिषद पार पडली यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकाला संदर्भातली माहिती दिली.

 यावर्षी दहावीचा निकाल हा 99.95 टक्के लागला आहे. या निकालाचा विभागनिहाय विचार केला तर  सर्वाधिक शंभर टक्के निकाल हा कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा म्हणजे 95.55 टक्के आहे.

 पुनर परीक्षार्थी निकालाची टक्केवारी 90.55 टक्के इतकी असून जवळजवळ 957 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96 टक्के इतके आहे तर त्या तुलनेने मुलांची टक्केवारी 99.94टक्के आहे.

 असा पहा दहावीचा निकाल

विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी बोर्डाचे अधिकृत संकेतस्थळ https://result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in वर जावे.

नंतर एसएससी बोर्ड रिजल्ट या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाईप करा. सीट नंबर टाईप करताना स्पेस देऊ नये. आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावीत. लगेच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंट आऊट  काढू शकणार आहेत.

English Summary: today declare 10th class result Published on: 16 July 2021, 01:22 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters