शिक्षण करण्याची हौस प्रत्येक विद्यार्थ्याला असते. जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर बहुतांशी विद्यार्थी अगदी असामान्य बुद्धिमत्तेचे असतात. परंतु बऱ्याचदा घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अशा विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची पाळी बऱ्याचदा येते. तसे पाहायला गेले तर आता इंटरनेटच्या जमान्यात सगळ्या प्रकारचे लोन असो किंवा इतर शैक्षणिक गोष्टींविषयीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध असते.
परंतु बऱ्याचदा अशी माहिती अभावी म्हणा किंवा योग्य सल्ला न मिळाल्याने अशा प्रकारचे सहाय्य अशा विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही व त्यांच्या शैक्षणिक करियर पूर्णपणे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते.
जर आपण शिक्षणासाठी आवश्यक पैसा उभा करायचा ठरला तर अनेक बँकांच्या मार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. परंतु पुरेशी माहिती नसल्या कारणाने आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या लेखात शैक्षणिक कर्ज विषयी अल्पशी माहिती देण्याचा हा प्रयत्न.
शैक्षणिक कर्जाचे हे आहेत चार प्रकार
1- करियर एज्युकेशन लोन- एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेऊन स्वतःचे करिअर करायचे असेल तेव्हा तो करियर एज्युकेशन लोन घेऊ शकतो.
2- प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टूडेंट लोन- प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडन्ट लोन हे विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यास सुरू ठेवण्यासाठी दिले जाते.
3- पालक कर्ज- जेव्हा विद्यार्थ्यांचे पालक मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतात, त्या कर्जाला पालक कर्ज असे म्हणतात.
4- अंडर ग्रॅज्युएट लोन- जेव्हा विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होते त्यानंतर देशात आणि परदेशात पदवी मिळवण्यासाठी पदवीपूर्व कर्ज अर्थात अंडर ग्रॅज्युएट लोन दिले जाते.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
1- अर्जदाराचा वयाचा पुरावा
2- पासपोर्ट साईज फोटो
3- सगळे आवश्यक मार्कशीट
4- बँकेचे पासबुक
5- अर्जदाराचा ऍड्रेस प्रूफ
6- अर्जदार करत असलेल्या अभ्यासक्रमाची डिटेल्स
7- विद्यार्थी आणि पालकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड
8- पालकांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक
साधारणतः बँकेत गेल्यानंतर
1- सर्वप्रथम तुम्हाला बँक किंवा संस्था यांची निवड करावी लागेल
2- तर तुम्ही ज्या प्रकारचे कर्ज घेणार आहात त्याची सर्व माहिती मिळवा.
3- बँकेने तुम्हाला सांगितलेल्या व्याजदर नीट समजून घ्यावेत.
4- बँका आणि तुमची खात्री झाल्यावर कर्जासाठी अर्ज करावा.
Share your comments