आपला देश सध्या देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. एका बाजूला देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. मात्र दुसरीकडे देशातील मूलभूत प्रश्न तेच आहेत. औरंगाबाद मधील कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील गांधीरी नदीवरील नळकांडी पुल वाहुन गेल्याने शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाण्याऱ्या विद्यार्थ्यांचा जिवघेणा प्रवास सुरू आहे.
असे असताना मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही. यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. धरणाचा सांडवा या नदीला येऊन मिळतो, तसेच सांडव्याचा पाण्याचा ओघ वाढला की अश्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे आधीचा पूल देखील लोकांनीच बांधला होता. आता हा पूल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे.
शेतवस्तीवरील चिकलठाण जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलांना लटकत जावे लागत आहे. नदीत पाणी असल्याने विद्यार्थी एका काठीला लटकून इकडून-तिकडे जात आहे. त्यांच्या या जीवघेणा प्रवास एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होऊ शकते.
Mohit kamboj: बारामती ॲग्रोचा अभ्यास सुरु, आता रोहित पवार अडचणीत येणार?
याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. पुढाऱ्यांच गाव अशीही या गावाची ओळख आहे. तालुक्यातील राजकारणात चिखलठाणा गावाचं मोठं वजन आहे. मात्र तरीही गावात अशी परिस्थिती आहे. आता नेतेमंडळी कुठे आहेत असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
'दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु आणि 4 किलो मटण खाणारा गद्दार आमदार'
ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ड्रायव्हर..
Share your comments