श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित,श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती येथील मृदा विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे आठव्या सत्रातील विद्यार्थी मित्रांद्वारा शेतकऱ्या करिता विविध प्रात्यक्षिक व उपक्रमे राबवण्यात येत आहेत.
शेतकरी बांधवांच्या शेतातील माती, पाणी,तुती व खत चाचणी असो, कंपोस्ट खते, नाडेप खत पद्धती उपक्रम, गांडूळ खत यांचे प्रात्यक्षिक डेमो विद्यार्थी मित्रांनी महाविद्यालय परिसरात स्वतः बांधकाम करून निर्माण केले आहे.
मृदा विज्ञान व कृषि रसायनशास्त्र या विभागात आठव्या सत्रात विविध विषय शिकविले जातात.
या विषयाला अनुसरून शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करून महाविद्यालयाच्या मृदा विज्ञान विभागातील प्रयोगशाळेत पिकांसाठी आवश्यकअन्नद्रव्ये उपलब्धता व त्यांची निकड पाहण्यासाठी व सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची प्रत पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनी शेतकऱ्यांकडे जाऊन नमुने घेतले व त्यांचे जलदगतीने परीक्षण केले.
नियमित वर्गा दरम्यान त्यांचे पृथःकरण विद्यार्थ्यांनी केलेले आहे. मोडूल कोर्स मध्ये शिका व कमवा या योजने अंतर्गत विद्यार्थी मित्रांनी तपासलेल्या नमुन्याचा मोबदला म्हणून प्रती नमुना काही मानधन त्यांना देण्यात येणार आहे.
च्याशी समन्वय राखण्याची तसेच त्यांच्यासोबत कार्य करण्याची व भविष्यात रोजगार निर्माण करण्याची संधी मिळणार असल्याचे मोडुल प्रमुख प्रा.डॉ. दीपक पाडेकर सर यांनी सांगितले. या व्यतिरिक्त सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता शेण, मलमूत्र तसेच उघड्यावर पडलेला काडी-कचरा विल्हेवाट लावण्यासाठी विविध प्रात्यक्षिके आठव्या सत्रातील विद्यार्थी मित्रांनी तयार केलेत, जेणेकरून भविष्यात यामधून स्वतः विद्यार्थाना व महाविद्यालयास उत्पन्न स्रोत मिळेल. तसेच हे प्रात्यक्षिके पाहून शेतकरी मित्रांना गांडूळ खत, कंपोस्ट खते, नाडेप उपक्रम आपल्या शेतात तयार करून सेंद्रीय शेती करण्यास प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे.
या समस्त उपक्रमासाठी प्राचार्य डॉ नंदकिशोर चिखले सर, विभाग प्रमुख डॉ.सुरेंद्र गावंडे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विविध उपक्रमासाठी विध्यार्थ्यांना मोडूल अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. दीपक पाडेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य टिकाईत,गोपाल सरनाईक, नागपाल इंगोले, निखिल नागे, ऋषिकेश तनमने, भागवत सावळे, राहुल मांटे, प्रविण पांडे, जिवन सूपले, प्रथमेश रायपुरे, सचिन मुंडे,आकाश सुर्वे, तुकाराम चांदणे, शुभम भोपळे,सौरव काकडे, निनाद तेलंग, गौरव सुराटने, समीर शेख, प्रतीक ठाकरे, ऋषिकेश भेले, कपिल वानखेडे, स्नेहल घुगे, कल्याणी ढाले, पूजा ठाकरे, निकिता ढोरे, रजनी कांबळे,सुरेखा सुरूशे, अदिती बुटे, शामल धुर्वे, आकांक्षा इंगळे, अर्चना सावळकर, आदिती ताथोडे, प्रतीक्षा वांगे, वैष्णवी पेटे, वैष्णवी झिपरकर, पल्लवी ठाकरे आदी समस्त विद्यार्थी मित्रांनी कार्य केलेले आहे.
Share your comments