1. शिक्षण

Education News: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शैक्षणिक कर्ज हवे असेल तर आता दहा लाखांपर्यंत कर्ज मिळेल हमीशिवाय,वाचा डिटेल्स

जर आपण शिक्षणाचा विचार केला तर अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षण हवे असेल तर लागणारे शुल्क देखील खूप मोठ्या प्रमाणावर लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांना एवढे महागडे शुल्क भरून शिक्षण घेणे परवडण्यासारखे नसते.प्रत्येक पालकाची आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे ही इच्छा असते.परंतु आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण देणे शक्य होत नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
update to education loan

update to education loan

जर आपण शिक्षणाचा विचार केला तर अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षण हवे असेल तर लागणारे शुल्क देखील खूप मोठ्या प्रमाणावर लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांना एवढे महागडे शुल्क भरून शिक्षण घेणे परवडण्यासारखे नसते.प्रत्येक पालकाची आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे ही इच्छा असते.परंतु आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण देणे शक्य होत नाही.

नक्की वाचा:​​Jobs 2022: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! आजच UPSC च्या या भरतीसाठी करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर...

 त्यासोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक तरुण असाधारण बुद्धिमत्तेचे असतात. परंतु बऱ्याचदा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडणे भाग पडते. यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना देखील विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. कारण आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हा त्यामागचा उद्देश असतो.

एवढेच नाही तर बँकांकडून देखील शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. या पार्श्वभूमीवर आता शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर आले असून ती म्हणजे केंद्र सरकार आता शैक्षणिक कर्जाच्या स्वरूपामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असून शैक्षणिक कर्जाची मर्यादा  आता वाढणार असल्याचे समोर येत आहे.

नक्की वाचा:जाणून घ्या, अन्न तंत्रज्ञान उद्योगात करिअरच्या वाढत्या संधी, करू शकता जबरदस्त करियर

 कोणत्याही हमीशिवाय मिळेल शैक्षणिक कर्ज

 जर आपण शैक्षणिक कर्जाचा विचार केला तर या विरोधात बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे सरकारने शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत असलेले काही नियम शिथिल केले आहे. जर आपण आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला तर बँक विद्यार्थ्याकडून साडेसात लाख रुपयांच्या कर्जासाठी कोणत्याही हमीची मागणी करत नाही म्हणजेच साडेसात लाख रुपये शैक्षणिक कर्ज विनातारण देण्यात येते.

परंतु सरकार आता ही मर्यादा साडेसात लाख रुपयांवरून दहा लाख रुपये करणार आहे. या बाबतीत केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाच्या संबंधित विभागाने शिक्षण मंत्रालयाशी या बाबतीत चर्चा सुरू केली असून शैक्षणिक कर्जाची हमी मर्यादा  33 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा विचार यामध्ये केला जात असून संपूर्ण देशात त्यामुळे आता विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक कर्जाची मर्यादा वाढणार आहे.

नक्की वाचा:Education News: खुशखबर! आता 'या' विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये स्कॉलरशिप, वाचा डिटेल्स

English Summary: now get ten lakh rupees education loan in without guarantee take decision by goverment Published on: 13 October 2022, 07:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters