1. शिक्षण

एएनएम आणि जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

यावर्षी एएनएम आणि जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी सीईटी ( सामाईक प्रवेश परीक्षा ) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
not required cet for nursing

not required cet for nursing

 यावर्षी एएनएम आणि जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी सीईटी ( सामाईक प्रवेश परीक्षा ) घेण्यात येणार नसल्याची  माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

अमित देशमुख म्हणाले की, त्याअगोदर एएनएम आणि जीएनएम च्या प्रवेश प्रक्रिया या सीईटीच्या  गुणाच्या आधारे राबविल्या जात होत्या. परंतु या वर्षापासून ही प्रवेश प्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारित असेल.

कोरोना महामारी च्या काळामध्ये डॉक्टर्स तसेच नर्स,पॅरामेडिकल स्टाफ व आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व अधोरेखित झाले असून येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणार्‍या परिचारिकांना किमान समान वेतन मिळत आहे का याबाबतची पाहणी ही महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पेरा वैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

 पुढे बोलताना वैद्यकीय मुख्यमंत्री देशमुख म्हणाले की, आज किती रुग्णांना मागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी किती नर्सेस असाव्यात हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून परिचारिका सुद्धा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्यानेकिती रुग्णांना मागे किती परिचारिका असाव्यात याचा अभ्यास संबंधित मंडळानेकरणे गरजेचे आहे. तसेच इतर राज्यात याबाबत काय परिस्थिती आहे याबाबतचा अभ्यास करून सदर अहवाल सादर करावा, अशा आशयाच्या सूचनाही देशमुख यांनी यावेळी केल्या.

English Summary: not required cet for the anm and gnm admission Published on: 27 August 2021, 09:19 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters