महाराष्ट्र पोलीस भरती बारा हजार पदांची भरती

12 January 2021 01:59 PM By: KJ Maharashtra
Police Recruitment

Police Recruitment

बेरोजगार असलेल्या आणि लोक डॉन मध्ये नोकरी गेलेल्या असंख्य तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यात जवळजवळ 12538 जागांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे असा आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. 

त्यामुळे येत्या काही दिवसात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.मंत्री अनिल देशमुख यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, पोलीस दलातील 12538 विविध पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे बोलले जाते. एकूण पदांमध्ये पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती होणार आहे. 

तर उरलेल्या जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती होईल अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.जर या सगळ्या जागा भरल्यानंतर जर गरज पडली तर पोलिस खात्यात आणखी पाच हजार पदे भरण्यावर  विचार करण्यात येईल असा विश्वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरती चा निर्णय घेतला होता.

मात्र 9 सप्टेंबर 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया लगेच थांबविण्यात आली होती.

police Police Recruitment job
English Summary: Maharashtra Police Recruitment Recruitment of twelve thousand posts

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.