नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मुंबई मेट्रो मध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये काही ठराविक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुंबई मेट्रो मध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापक सारख्या पदाची भरती पार पडणार आहे.
कोणत्या पदासाठी आहे भरती
मित्रांनो मुंबई मेट्रो रेल्वे मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी देखील 2 जागा भरल्या जातील. 2 जागा उपअभियंता या पदासाठी आहेत. कनिष्ठ पर्यवेक्षक या पदासाठी देखील 1 जागा आहे. कनिष्ठ अभियंताच्या एकूण 16 जागा आहेत तर असिस्टंट (आयटी) याची 1 जागा भरली जाईल.
शैक्षणिक अहर्ता
या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने कुठल्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी ग्रहण करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अहर्ता जाणून घेण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला जरूर भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे तसेच या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही भरती प्रक्रिया केवळ मुलाखत द्वारे राबवली जाणार आहे.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख:- 15 एप्रिल 2022
वेतनमान:- पदानुसार वेतन मध्ये बदल असणार आहे. एकंदरीत 34 हजार रुपयापासून ते दोन लाख रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे.
अर्ज कुठं पाठवायचा:-
ज्या पात्र उमेदवारांना मुंबई मेट्रो मध्ये निम्णलिखित पदांसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासमवेत काही आवश्यक कागदपत्रे देखील जोडने अपरिहार्य राहणार आहे यासाठी आपण मुंबई मेट्रो रेल्वेची अधिकृत वेबसाईट तपासू शकता.
अर्जदाराला अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.
संबंधित बातम्या:-
Job Alert: MS-CIT केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; इच्छुकांनी लवकरात लवकर करा अर्ज
Share your comments