1. शिक्षण

Job Alert: MS-CIT केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; इच्छुकांनी लवकरात लवकर करा अर्ज

एमएस-सीआयटी केलेल्या आणि सरकारी नोकरी (Government Job) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई (Maharashtra Airport Development Company Limited Mumbai) येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कंपनीत काही जागांसाठी भरती केली जाणार आहे यासंदर्भात कंपनीने जाहिरात देखील जारी केली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
government job opportunity in mumbai on the basis of ms-cit

government job opportunity in mumbai on the basis of ms-cit

मुंबई:- राज्यातील एमएस-सीआयटी (Ms-CIT) केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एमएस-सीआयटी केलेल्या आणि सरकारी नोकरी (Government Job) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई (Maharashtra Airport Development Company Limited Mumbai) येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या कंपनीत काही जागांसाठी भरती केली जाणार आहे यासंदर्भात कंपनीने जाहिरात देखील जारी केली आहे. सहाय्यक (Assistant), कनिष्ठ प्रणाली अभियंता (Junior System Engineer) या पदांसाठी कंपनीत भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी या महिनाअखेर अर्थात 31 मार्च 2022 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या जाहिराती विषयी सविस्तर.

कोणत्या पदासाठी होणार आहे भरती:- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई येथे सहाय्यक आणि कनिष्ठ प्रणाली अभियंता या दोन पदांसाठी (Government Jobs In Maharashtra) भरती आयोजित केली गेली आहे.

या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता:- »सहाय्यक:- या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी धारक (Bachelor's Degree) उमेदवार अर्ज करु शकणार आहे. उमेदवाराने मात्र मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून अथवा विद्यापीठातून पदवी धारण केलेली असणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवाराला कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे, यासाठी उमेदवाराने एमएससी-आयटी हा कोर्स केलेला असावा.

»कनिष्ठ प्रणाली अभियंता या पदासाठी शैक्षणिक अहर्ता:- या पदासाठी देखील इच्छुक उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी ग्रहण करणे आवश्यक असणार आहे. या समवेतच इच्छुक उमेदवाराने एमएस-सीआयटी केलेले असणे अनिवार्य राहणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:- मित्रांनो या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शिफारस करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना खालील निम्नलिखित कागदपत्रे जोडणे अपरिहार्य राहणार आहे.

»बायोडेटा (Resume)

»दहावी बोर्डाचे प्रमाणपत्र, बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, पदवीच्या शेवटच्या वर्षाचे प्रमाणपत्र

»शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

»जे उमेदवार मागासवर्गीय प्रवर्ग यातून अर्ज करणार आहेत त्यांना जातीचा दाखला जोडणे अनिवार्य राहणार आहे.

»उमेदवारांना ओळखपत्र जोडणे देखील अनिवार्य राहणार आहे यामध्ये आधार कार्ड किंवा लायसन्स याचा समावेश असू शकतो.

»याव्यतिरिक्त इच्छुक उमेदवारांना आपले पासपोर्ट साईज फोटो जोडावे लागणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:- निम्नलिखित पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले गेले आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, 8वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-400005 या पत्त्यावर पाठवावे लागणार आहेत.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:- 31 मार्च 2022

संबंधित बातम्या:-

आनंदाची बातमी! Indian Oil मध्ये नोकरीची संधी; 1 लाख रुपये महिना…..!

काय सांगता! ST मध्ये 10 हजार पदांची भरती; जाणून घ्या याविषयी

आनंदाची बातमी! 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी 'या' ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या याविषयी

English Summary: government job opportunity in mumbai maharashtra Published on: 19 March 2022, 11:17 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters