दिल्ली विद्यापीठात (Delhi University Jobs) परीक्षा न देता नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. सदरची भरती दिल्ली विद्यापीठ (Job Opportunity) अंतर्गत येणाऱ्या श्री गुरु तेगबहादूर महाविद्यालय या विद्यालयासाठी राबविली जाणार आहे.
या नोकरी (Job Alert) विषयी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, मात्र या पदांसाठी अर्ज करण्यास केवळ दोन दिवस शेष राहिले आहेत. ज्या पात्र इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करणे अपरिहार्य झाले आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी colrec.du.ac.in या अधिकृत साइटवर भेट द्यावी लागेल. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
दिल्ली विद्यापीठाची जाहिरात समजून घेऊया
पदासाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख:- इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दिल्ली विद्यापीठाकडून 5 मार्च पासून मागविले जात आहेत.
पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख:- या पदासाठी 20 मार्च 2022 ही तारीख अर्ज सादर करण्याची शेवटची ठेवण्यात आली आहे.
महत्वाची बातमी:-Job Alert: MS-CIT केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; इच्छुकांनी लवकरात लवकर करा अर्ज
कोणत्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली आहे:- सहाय्यक प्राध्यापक : 66 पदे
»इंग्रजी विषयासाठी एकूण 7 पदे भरली जाणार आहेत.
»पंजाबी या विषयासाठी एकूण 5 पदे भरली जाणार आहेत.
»हिंदी या विषयासाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत.
»अर्थशास्त्र या विषयासाठी एकूण चार पदे भरली जाणार आहेत.
»इतिहास या विषयासाठी एकूण चार पदे भरली जाणार आहेत.
»राज्यशास्त्र या विषयासाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत.
»वाणिज्य या विषयासाठी एकूण अकरा पदे भरली जाणार आहेत.
»गणित या विषयासाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत.
»वनस्पतिशास्त्र या विषयासाठी एकूण 6 पदे भरली जाणार आहेत.
»रसायनशास्त्र या विषयासाठी एकूण दोन पदे भरली जाणार आहेत.
»इलेक्ट्रॉनिक्स यासाठीदेखील एकूण दोन पदे भरली जाणार आहेत.
»संगणक विज्ञान या विषयासाठी एकूण 5 पदे भरली जाणार आहेत.
»भौतिकशास्त्र या विषयासाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत.
»प्राणीशास्त्र या विषयासाठी एकूण सहा पदे भरली जाणार आहेत.
»पर्यावरण विज्ञान या विषयासाठी एकूण दोन पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक अहर्ता:- दिल्ली विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज मागवले गेले आहेत. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात कमीत कमी 55% गुण प्राप्त करून पदवीचे शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.
संबंधित विषयातील पदवी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किंवा शैक्षणिक संस्थे कडून ग्रहण केलेली असणे अनिवार्य आहे. यासोबतच इच्छुक उमेदवारांने यूजीसी नेट किंवा CSIR Net या परीक्षादेखील उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अर्जदार दिल्ली विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतो.
अर्जाची फी:- ओबीसी ओपन तसेच ईडब्ल्यूएस श्रेणीतील इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पाचशे रुपये एवढी फी मोजावी लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग तसेच महिला उमेदवारांना मात्र अर्ज करणे विनाशुल्क आहे.
संबंधित बातम्या:-
आनंदाची बातमी! Indian Oil मध्ये नोकरीची संधी; 1 लाख रुपये महिना…..!
काय सांगता! ST मध्ये 10 हजार पदांची भरती; जाणून घ्या याविषयी
आनंदाची बातमी! 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी 'या' ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या याविषयी
Share your comments