सध्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागांच्या अंतर्गत असलेल्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून याबाबत राज्यात असलेल्या दीड लाख रिक्त जागापैकी विविध विभागांतर्गत असलेल्या 75 हजार जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाणार असल्याचा निर्णय देखील राज्य सरकारने नुकताच घोषित केला. त्यामुळे आता परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठे सुवर्णसंधी या माध्यमातून चालून येत असून संधीचे सोने करण्याची गरज आहे.
याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी पुढे आली असून राज्यातील जिल्हा परिषदांच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून या भरतीचे म्हणजेच गट क साठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 15 आणि 16 ऑक्टोबरला गट क या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार
असून पुढच्या पंधरा दिवसात त्याचा निकाल देखील लावला जाणार असल्याचे राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात असलेल्या जिल्हा दुय्यम निवड मंडळाच्या मार्फत ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून या पदांसाठी परीक्षा होणार असून 17 ते 21 ऑक्टोबरच्या दरम्यान निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांची लिस्ट सुद्धा जारी केली जाणार आहे.
नक्की वाचा:Mpsc Recruitment: सुवर्णसंधी! एमपीएससीमार्फत 961 जागांसाठी मोठी भरती,वाचा सविस्तर माहिती
एवढेच नाही तर नियुक्त्यासंदर्भात पुढील कारवाई करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आले आहेत. मार्च 2019 च्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित भरतीचे विस्तृत वेळापत्रक आणि त्याबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून मार्च 2019 च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट-क पदाच्या भरती बाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून
यामध्ये आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,लॅब टेक्नीशियन,औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक इत्यादी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाणार आहे.
Share your comments