1. शिक्षण

Mpsc Recruitment: सुवर्णसंधी! एमपीएससीमार्फत 961 जागांसाठी मोठी भरती,वाचा सविस्तर माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून येणारा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या अंतर्गत वेगवेगळ्या संवर्गातील तब्बल 961 रिक्त पदांसाठी मेगा भरती केली जाणार असून जे विद्यार्थी भरती पडण्याची चातकासारखी वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. या लेखात आपणया भरती प्रक्रिये विषयी थोडक्यात जाणून घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mpsc recruitment

mpsc recruitment

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून येणारा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या अंतर्गत वेगवेगळ्या संवर्गातील तब्बल 961 रिक्त पदांसाठी मेगा भरती केली जाणार असून जे विद्यार्थी भरती पडण्याची चातकासारखी वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. या लेखात आपणया भरती प्रक्रिये विषयी थोडक्यात जाणून घेऊ.

नक्की वाचा:Agri News: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद

 या भरती विषयी माहिती

 एकूण 961 जागा आहेत त्यापैकी 161 पदांच्या भरती करिता येणाऱ्या 21 ऑगस्टला म्हणजेच रविवारी राज्यसेवेची(2022) पूर्व परीक्षा ही राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. व या प्रेलिमस अर्थात पूर्वपरीक्षेत जे उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांची मुख्य परीक्षा 21 ते 23 जानेवारी 2023 यादरम्यान होईल.

आगामी काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण 800 पदांची भरती होणार असून त्यासाठी आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 येत्या 8 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार असून महत्त्वाचे म्हणजे दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक हे पद प्रथमच एमपीएससी द्वारे आता भरले जाणार आहे.

नक्की वाचा:पोस्ट खात्यात मेगाभरती: भारतीय पोस्ट विभागाकडून तब्बल 1 लाख जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा, वाचा तपशील

पूर्वपरीक्षेचा निकालाचा आधार घेऊन मेन एक्झाम अर्थात मुख्य परीक्षेसाठी जे उमेदवार पात्र ठरतील अशा करीता मुख्य परीक्षा डिसेंबर 2022 नंतर होईल.

दुय्यम सेवा अराजपत्रित,गट संयुक्त पूर्व परीक्षेतील संवर्ग आणि एकूण पदे-2022

1- सहाय्यक कक्ष अधिकारी गट - एकूण 42 पदे

2- राज्य कर निरीक्षक- एकूण 77 पदे

3- पोलीस उपनिरीक्षक- 603 पदे

4- दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक- 78 पदे

 अशी एकूण आठशे पदे आहेत

नक्की वाचा:Recruitment: महिला बालविकास विभागात नोकरीची संधी, घाई करा 19 ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम तारीख

English Summary: recruitment for verious post of maharashtra state government department by mpsc Published on: 19 August 2022, 11:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters