सध्या विविध विविध क्षेत्रात म्हणजे सरकारी असो की खाजगी यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांच्या जाहिराती निघत आहे. अगदी याच पार्श्वभूमीवर आता जे विद्यार्थी बँकांच्या विविध प्रकारच्या भरतीची तयारी करत आहेत अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठीची नोटिफिकेशन अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पदांसाठी होणार आहे भरती
बँक ऑफ बडोदा मध्ये जी काही भरती होणार आहे ती डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट, स्पेशल अनालिटिक्स, बिझनेस मनेजर, डिजिटल लेंडिंग रिस्क स्पेशालिस्ट,झोनल लीड मॅनेजर तसेच लीड, बिजनेस लीड, अनालीटिक्स, डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट आणि इतर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे व ही भरती 76 पदांसाठी घेतली जाणार आहे.
लागणारी शैक्षणिक अहर्ता
या पदांसाठी उमेदवार अर्ज करतील त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासोबतच संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचे आहे.
उमेदवाराचे वय
या भरतीसाठी जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचे वय हे पदानुसार 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
नक्की वाचा:Naukari News:चालून आली आहे हवामान खात्यात नोकरी करण्याची संधी,वाचा सविस्तर माहिती
अनुभव आवश्यक
इच्छुक उमेदवारांना संबंधित कामाचा पदानुसार तीन ते चार वर्षांचा अनुभव असावा.
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे
अर्जासोबत उमेदवारांना दहावी,बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे,लिव्हिंग सर्टिफिकेट,जातीचा दाखला( उमेदवार मागासवर्गीय कॅटेगरीतील असतील तर),
ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट आकाराचे फोटो हे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या रिक्त पदासाठी आरक्षित वर्गातील जे काही उमेदवार अर्ज करतील त्यांना पदभरती आणि वयामध्ये जे काही सवलती सरकारी नियमानुसार आहेत त्या देण्यात येतील.
अर्जासाठी लागणारे शुल्क
या भरतीचा अर्जासाठी ओपन कॅटेगरीतील उमेदवारांकडून सहाशे रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल असे उमेदवार 11 ऑक्टोंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
टीप- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
Share your comments