1. शिक्षण

महात्मा फुले यांचे हे शिक्षणविषयक विचार महिती आहेत का?

शिक्षण व अभ्‍यासक्रमातून प्रकट होणारा फूले शाहू आंबेडकरी विचार आपल्या शिक्षणातून

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
महात्मा फुले यांचे हे शिक्षणविषयक विचार महिती आहेत का?

महात्मा फुले यांचे हे शिक्षणविषयक विचार महिती आहेत का?

शिक्षण व अभ्‍यासक्रमातून प्रकट होणारा फूले शाहू आंबेडकरी विचार आपल्या शिक्षणातून आणि तसेच्या अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे.

शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का जगावे, जीवन कसे जगावे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवन पूर्ण कसे करावे. आपण जीवनातून काय घ्यावे व इतरांना काय दयावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच

'शिक्षणानेच सर्व काही होत आहे, त्याकरिता आधी शिक्षण घेतलेच पाहिजे'

जीवन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे आणि आपल्या सर्व थोर शिक्षणतज्ज्ञांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जीवन शिक्षणाची धुरा सांभाळली आहे आणि सर्वांना जगण्याची एक दशा आणि दिशा देण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. २१व्या शतकामध्ये शिक्षण घेणारा समुदाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण त्यातून जीवनविषयक शिक्षण मिळत आहे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. तेव्हा आपल्या शिक्षणतज्ज्ञांचे आजच्या

शिक्षणातून व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार निश्चितच येणा-या भविष्यकालीन समस्यांचे निराकरण व उत्तम जीवन जगण्यासाठी दिशादर्शक ठरतील. यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मार्गदर्शनपर आहेत. शिक्षण आणि अभ्यासक्रमामध्ये जे विचार आहेत. ते याच थोरांचे आहेत.

प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत - प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि त्यामुळे हे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तसेच म. फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. ही मागणी त्यांनी १९ ऑक्टोबर १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगापुढे एका शिक्षणावर अधिक भर देईल तर नीतीच्या आणि सद्वर्तनाच्या दृष्टीने कितीतरी चांगले लोक शिकून तयार होताना मुळीच अडचण पडणार नाही. या विचारातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यावर भर दिला. प्राथमिक शिक्षकांची तरतूद करणे - प्राथमिक शिक्षणास मोफत व सक्तीचे केल्यास विदयार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता होती आणि त्याकरिता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक असणे देखील आवश्यक आहे आणि त्याकरिता प्रथम आवाज उठविणारे म. फुले हे एकमेव व्यक्ती होते. प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. त्यामुळे या स्तरावरील शिक्षण उत्तम दर्जाचे असावे. यावर अधिक भर देण्यात आला.

प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे - सरकारी नोक-यांमध्ये सर्व वरिष्ठ वर्गाची मक्तेदारी आहे, असे दिसून आल्यावर शिक्षण खालच्या वर्गातील तळागाळातील लोकांना मिळावे. यासाठी म.फुले यांनी प्राथमिक शिक्षण खालच्या वर्गास देण्यावर अधिक भर दिला. उच्च शिक्षणाकडे कमी व ग्रामीण जनतेच्या प्राथमिक शिक्षणाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षणातून उद्याची भावी पिढी घडत असते आणि आज जे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. त्यामागे म. फुलेंचे विचार, असलेले दिसून येतात. आपल्या देशामध्ये आजची परिस्थिती लक्षात घेता कमी शिकलेले अध्यापक व अनुभव कमी असलेले शिक्षक प्राथमिक स्तरावर अध्यापन करताना दिसतात आणि अधिक अनुभवी व विषयतज्ज्ञ अध्यापक वर्ग वरच्या वर्गास अर्थात उच्च स्तर अध्यापन करतात. तेव्हा वेळोवेळी प्राथमिक शिक्षण अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण देणे ही काळाजी गरज बनली आहे आणि त्या दृष्टीकोनातून विचार म. फुलेंनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण - बहुजन समाज ग्रामीण भागामध्ये राहत असल्याने, त्यांच्या शिक्षणाची म. फुले यांना अधिक काळजी वाटत असे. २ मार्च १८८८ मध्ये म. फुले म्हणाले होते की आपली बहुतांश जनता खेड्यात निवास करते. तेव्हा शासनाने ग्रामीण लोकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवावे. राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण - आपल्या देशात बहुजन समाज अजाण व अडाणी आहे. त्यांच्या उद्धारासाठी. शिक्षण हा एकमेव उपाय आहे. शुद्रांना शिक्षण देऊन सुशिक्षित केल्याशिवाय राष्ट्र बनू शकत नाही. ज्या देशात सामाजिक आणि आर्थिक गुलामी असते तेथे राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. यावर अधिक भर होता.

शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल - म. फुले यांच्या मते आजची शिक्षण पद्धती ही बहुजन समाजाला शिक्षणपासून वंचित करणारी होती. तेव्हा शिक्षणप्रणाली बदलली पाहिजे यावर अधिक भर दिला गेला. केवळ कारकून वर्ग तयार करणा-या वर्गाची निर्मिती शिक्षणातून होऊ नये, तर मानवी जीवन जगण्यास सक्षम बनवणारे, उदद्योगी, जीवनोपयोगी शिक्षण देण्यात यावे.

त्रिभाषा सूत्राचा अवलंब - (१९६४-६६) च्या कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्रास जरी आजच्या कालावधीत मान्यता दिलेली असली तरी या अगोदर ७७ वर्षांपूर्वी म. फुले यांनी त्रिभाषा सूत्राचा अवलंब शिक्षणात करावा यावर भर दिला होता.

शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा - जनसामान्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा ह्यासाठी खेड्यापाड्यातील जनतेला शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहाची व्यवस्था करण्याची कल्पना म. फुले यांनी मांडली आणि गरीब, होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा देण्यावर भर दिला.

शिक्षणाविषयक ज्ञान व विचार - शिक्षण हा तिसरा डोळाच मानले जाते आणि त्यामुळेच म. फुले यांनी शिक्षणावर अधिक प्रकाश टाकला आहे आणि शिक्षण कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी न बनता, सर्वांना शिक्षण मिळावे, शिक्षणाचा प्रसार होऊन, ज्ञान व विचारांची वृद्धी व्हावी यासाठी म. फुलेंनी योगदान दिले. म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथाच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालगृहाची स्थापना देखील केली. अशाप्रकारे म. फुले यांनी समाज परिवर्तनाचे कार्य करताना स्वत:च्या घरदाराचाही विचार न करता काम केले आणि म्हणून आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. अशा शिक्षणतज्ज्ञाला, शिक्षणमहर्षीच्या कार्याला कोटी-कोटी वंदन.

शिक्षण व अभ्‍यासक्रमातून प्रकट होणारा फूले शाहू आंबेडकरी विचार प्रा. वैशाली शा कंकाळे, अकोला

आपल्या शिक्षणातून आणि तसेच्या अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे.

शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का जगावे, जीवन कसे जगावे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवन पूर्ण कसे करावे. आपण जीवनातून काय घ्यावे व इतरांना काय दयावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच'शिक्षणानेच सर्व काही होत आहे, त्याकरिता आधी शिक्षण घेतलेच पाहिजे'

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार - स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रयीवर नितांत भरवसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे म. फुले हे महापुरुष होते. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. ते मानवतावादी विचाराचे होते. त्यांनी मेकॉलेच्या खलित्यास कडाडून विरोध 'शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे' या विचारास फुलेंचा विरोध होता कारण इंग्रजाचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता. 'प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण दयावे 'आधी कळस मग पाया असे न होता, आधी पाया मग कळस’ अशा पद्धतीने शिक्षणप्रणाली असण्यावर म. फुलेंचा आग्रह होता. प्रथम उपेक्षितांना शिक्षण नंतर अपेक्षितांना शिक्षण’ हे सूत्र अंमलात आणावे, यावर भर देण्यात आला. 

महात्मा फुलेंचे शिक्षण विषयक विचार 

→ स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा → प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत → प्रशिक्षित शिक्षकाची तरतूद करणे → प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे → ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण→ राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण→ शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल विचार → व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण→ त्रिभाषा सूत्राचा अवलंब→ शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा → शिक्षणविषयक ज्ञान व विचार

स्त्री-शिक्षणाचा पाठपुरावा - पूर्वीच्या काळामध्ये या परिस्थितीत स्त्रियांनी शिक्षण घेणे. म्हणजे अधर्मच करणे होय. त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे कायमची उघडली जावी, म्हणून म. फुलेंनी स्त्री-शिक्षण मोहीम सर्वप्रथम हाती घेतली. शिक्षण हे समर्थ स्त्री म्हणून जगण्यासाठी दिले जावे. स्त्रियांचा खरा धर्म त्यांना शिक्षण देणे होय. स्त्रियांच्या मानसिकतेसाठी व सक्षम स्त्री घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून म. फुलेंनी आपल्या पत्नीस शिक्षण देऊन आदय शिक्षिका म्हणून कार्यास सुरुवात केली आणि स्त्री-शिक्षण मोहमेस सुरुवात केली.

प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत - प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि त्यामुळे हे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तसेच म. फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. ही मागणी त्यांनी १९ ऑक्टोबर १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगापुढे एका शिक्षणावर अधिक भर देईल तर नीतीच्या आणि सद्वर्तनाच्या दृष्टीने कितीतरी चांगले लोक शिकून तयार होताना मुळीच अडचण पडणार नाही. या विचारातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यावर भर दिला. प्राथमिक शिक्षकांची तरतूद करणे - प्राथमिक शिक्षणास मोफत व सक्तीचे केल्यास विदयार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता होती आणि त्याकरिता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक असणे देखील आवश्यक आहे आणि त्याकरिता प्रथम आवाज उठविणारे म. फुले हे एकमेव व्यक्ती होते. प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. त्यामुळे या स्तरावरील शिक्षण उत्तम दर्जाचे असावे. यावर अधिक भर देण्यात आला.प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देणे - सरकारी नोक-यांमध्ये सर्व वरिष्ठ वर्गाची मक्तेदारी आहे, असे दिसून आल्यावर शिक्षण खालच्या वर्गातील तळागाळातील लोकांना मिळावे. यासाठी म.फुले यांनी प्राथमिक शिक्षण खालच्या वर्गास देण्यावर अधिक भर दिला.

ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण - बहुजन समाज ग्रामीण भागामध्ये राहत असल्याने, त्यांच्या शिक्षणाची म. फुले यांना अधिक काळजी वाटत असे. २ मार्च १८८८ मध्ये म. फुले म्हणाले होते की आपली बहुतांश जनता खेड्यात निवास करते. तेव्हा शासनाने ग्रामीण लोकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवावे. राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण - आपल्या देशात बहुजन समाज अजाण व अडाणी आहे. त्यांच्या उद्धारासाठी. शिक्षण हा एकमेव उपाय आहे. शुद्रांना शिक्षण देऊन सुशिक्षित केल्याशिवाय राष्ट्र बनू शकत नाही. ज्या देशात सामाजिक आणि आर्थिक गुलामी असते तेथे राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. यावर अधिक भर होता. 

शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल - म. फुले यांच्या मते आजची शिक्षण पद्धती ही बहुजन समाजाला शिक्षणपासून वंचित करणारी होती. तेव्हा शिक्षणप्रणाली बदलली पाहिजे यावर अधिक भर दिला गेला. केवळ कारकून वर्ग तयार करणा-या वर्गाची निर्मिती शिक्षणातून होऊ नये, तर मानवी जीवन जगण्यास सक्षम बनवणारे, उदद्योगी, जीवनोपयोगी शिक्षण देण्यात यावे. 

त्रिभाषा सूत्राचा अवलंब - (१९६४-६६) च्या कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्रास जरी आजच्या कालावधीत मान्यता दिलेली असली तरी या अगोदर ७७ वर्षांपूर्वी म. फुले यांनी त्रिभाषा सूत्राचा अवलंब शिक्षणात करावा यावर भर दिला होता. शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा - जनसामान्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा ह्यासाठी खेड्यापाड्यातील जनतेला शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहाची व्यवस्था करण्याची कल्पना म. फुले यांनी मांडली आणि गरीब, होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा देण्यावर भर दिला. 

शिक्षणाविषयक ज्ञान व विचार - शिक्षण हा तिसरा डोळाच मानले जाते आणि त्यामुळेच म. फुले यांनी शिक्षणावर अधिक प्रकाश टाकला आहे आणि शिक्षण कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी न बनता, सर्वांना शिक्षण मिळावे, शिक्षणाचा प्रसार होऊन, ज्ञान व विचारांची वृद्धी व्हावी यासाठी म. फुलेंनी योगदान दिले. म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथाच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालगृहाची स्थापना देखील केली. अशाप्रकारे म. फुले यांनी समाज परिवर्तनाचे कार्य करताना स्वत:च्या घरदाराचाही विचार न करता काम केले आणि म्हणून आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. अशा शिक्षणतज्ज्ञाला, शिक्षणमहर्षीच्या कार्याला कोटी-कोटी वंदन.

 

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: Do you know these educational thoughts of Mahatma Phule? Published on: 12 April 2022, 09:27 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters