मराठा आरक्षणाच्या विषयी बरेच दिवसापासून विविध प्रकारचे पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणासोबतच विविध प्रकारच्या मागण्यांच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मार्फत विविध पदांसाठी घेतल्या गेलेल्या परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवड सूचीत असलेल्या जवळ जवळ 1064 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या बैठकीत सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की साधारणपणे दोन हजार पेक्षा जास्त उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत नियुक्त केले जाणार आहेत व यापैकी जवळजवळ 419 उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत.तर उर्वरित 1064 उमेदवारांना तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल व या नियुक्त्या ताबडतोब करण्यासंबंधीचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल.
702 उमेदवारांसाठी मोहीम
साधारणपणे 2185 उमेदवार मराठा आरक्षण देऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी 419 उमेदवार शासन सेवेत आधीच रुजू झाले आहेत तर 1064 उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.
तसेच उरलेले 702 उमेदवारांना नियुक्ती देण्यात संबंधित विशेष मोहीम देण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Share your comments