1. ऑटोमोबाईल

Car update: सणासुदीच्या मुहूर्तावर जर तुमचा एसयूव्ही कार घ्यायची योजना असेल तर 'या' एसयूव्ही आहेत तुमच्यासाठी फायद्याच्या,वाचा वैशिष्ट्ये आणि किंमत

सध्या सणासुदीच्या मुहूर्तावर बऱ्याच व्यक्ती नवनवीन वाहनांची बुकिंग करतात. काहीजण दुचाकी इतर काहीजण कार घेण्याचा प्लान करतात. प्रत्येक व्यक्ती वाहन घेताना कमी बजेटमध्ये चांगली वैशिष्ट्ये असलेले वाहन मिळवण्याचा प्रयत्न करतात. जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर अनेक वाहन निर्मात्या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी तसेच कार लॉन्च केले आहेत व बर्याच प्रकारच्या बुकिंग देखील सुरू आहेत. म्हणून या पार्श्वभूमीवर जर तुमचा देखील एखादी चांगली एसयुव्ही घ्यायचा प्लान असेल तर या लेखातील माहिती तुम्हाला फायदेशीर ठरेल.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
kia seltos car

kia seltos car

सध्या सणासुदीच्या मुहूर्तावर बऱ्याच व्यक्ती नवनवीन वाहनांची बुकिंग करतात. काहीजण दुचाकी इतर काहीजण कार घेण्याचा प्लान करतात. प्रत्येक व्यक्ती वाहन घेताना कमी बजेटमध्ये चांगली वैशिष्ट्ये असलेले वाहन मिळवण्याचा प्रयत्न करतात.

जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर अनेक वाहन निर्मात्या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी तसेच कार लॉन्च केले आहेत व बर्‍याच प्रकारच्या बुकिंग देखील सुरू आहेत. म्हणून या पार्श्वभूमीवर जर तुमचा देखील एखादी चांगली एसयुव्ही घ्यायचा प्लान असेल तर या लेखातील माहिती तुम्हाला फायदेशीर ठरेल.

नक्की वाचा:Car News: भावांनो! इलेक्ट्रिक कार घ्यायचा प्लान आहे का? थांबा ऑक्टोबरच्या 'या' तारखेपर्यंत, मिळेल स्वस्तात कार

 या आहेत चांगल्या वैशिष्ट्य असलेल्या एसयूव्ही कार

1- किया सेल्टोस- सध्या ही कार मिड साइज कॉम्पॅक्ट एस यू व्ही सेगमेंटमध्ये खूप बेस्ट असून खूप मजबूत देखील आहे. जर या कारच्या विक्रीचा विचार केला तर गेल्या महिन्यात अकरा हजार युनिटची विक्री कंपनीने केलेली आहे.

जर आपण या कारच्या विक्रीचा विचार केला तर वार्षिक बेसवर 15 टक्क्यांची ग्रोथ कंपनीने नोंदवली आहे. जर आपण या कारचा विचार केला तर सर्वाधिक विक्री होणार्‍या कारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ही कार आहे. जर या कारच्या किमतीचा विचार केला तर या कारची  दिल्ली एक्स शोरूम किंमत दहा लाख 49 हजार रुपये आहे.

नक्की वाचा:Kawasaki ने भारतात लाँच केली सर्वात स्वस्त रेट्रो बाईक, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

2- मारुती ग्रँड विटारा- अलीकडेच मारुती सुझुकी या प्रसिद्ध कंपनीने ग्रँड विटारा एसयूव्ही लॉन्च केली असून या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या कारची विक्री गेल्या महिन्यात फक्त 4769 युनिट विकी झाली होती.  परंतु या वाहनासाठी आत्ता 53 हजार पर्यंत बुकिंग सुरू असून त्यासाठी चार ते पाच महिन्याचा प्रतीक्षा कालावधी देखील आहे.  या कारची सुरुवातीची किंमत दहा लाख 45 हजार ते 19 लाख 65 हजार( एक्स शोरूम) दरम्यान निश्चित केली आहे.

3- ह्यूदाय क्रेटा-या कारची विक्री सातत्याने वाढत असून गेल्या महिन्यात 12866 विक्री कंपनीने केली आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीने 8193 युनिटची विक्री केली होती.

या तुलनेत वार्षिक बेस पाहिला तर 57 टक्के विक्री या वर्षी जास्त आहे.विक्रीच्या बाबतीत ही कार प्रथम स्थानावर असून दिल्लीत एक्स शोरूम किंमत दहा लाख 44 हजार रुपये आहे.

नक्की वाचा:Car News: अरे वा! 'या' आहेत जबरदस्त वैशिष्ट्य असलेल्या 3 एसयूव्ही कार, 1 लिटर पेट्रोलमध्ये धावतील 28 किमी

English Summary: this is three suv car is so featurable and affordable price in india Published on: 11 October 2022, 02:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters