टाटा मोटर्सने भारतामध्ये पहिला असा ट्रक लाँच केला आहे ज्यामध्ये कारला जशी सुरक्षेसाठी फीचर्स देण्यात आलेले असतात अगदी त्याचप्रमाणे याला सुद्धा देण्यात आली आहेत. एवढेच नाही तर टाटा मोटर्स ने सीएनजीवर चालणारे मध्यम आणि व्यावसायिक ट्रकही लाँच केले आहेत. टाटाने सीएनजी सोबतच बाजारात 5 ट्रक लाँच केले आहेत. जे की या ट्रक मध्ये चांगल्या प्रकारे फीचर्स देण्यात आलेले आहेत.
ADAS ya फीचर्स सोबत पहिला ट्रक लाँच :-
टाटा ने देशात इतिहास रचत प्रथमच ADAS सोबत ट्रक लाँच केलेला आहे. ADAS हे फीचर्स टाटा मोटर्स ने आपल्या बेस्ट सेलिंग ट्रक prima मध्ये दिले आहे. जे की हा ट्रक भारतामध्ये सर्वात सुरक्षित ट्रक ठरलेला आहे. भारतातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन CMS सोबत, लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम कंपनीने विकसित केली आहे. Prima ट्रक चे केबिन सुद्धा अशा प्रकारे बनवली आहे जशी की ड्रायव्हर ला खूप चांगला अनुभव भेटेल. तसेच थ्री-स्पोक स्टीयरिंग आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीवर नियंत्रण समाविष्ट आहे व ट्रक मध्ये सात इंच मोठी टचस्क्रीन सुद्धा बसवण्यात आलेली आहे.
हेही वाचा:-राज्यात वाढता उकाडा,पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याच्या अंदाज
MCV, HCV सेगमेंटमध्ये प्रथमच बाजारात वाहने :-
टाटाने भारतात प्रथमच 19 आणि 28 टन मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने भारतातील बाजारपेठेत लॉन्च केलेली आहेत. हे ट्रक 5.7 लीटर SGI इंजिन सीबत तयार आहेत जे 180 हॉर्सपॉवर आणि 650 Nm टॉर्क करतात. टाटा कंपनीने सांगितल्यानुसार या ट्रक ची रेंज ही १ हजार किमी असणार आहे.
हेही वाचा:-टाटा ची ब्लॅकबर्डचे लवकरच होतेय मार्केट मध्ये पदार्पण, जाणून घ्या या कार चे आकर्षक फीचर्स
ट्रक च्या शुभारंभवेळी संचालक म्हणतात :-
ज्यावेळी ट्रक चा शुभारंभ होता त्यावेळी कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की आमचे ट्रक भारताशी अगदी घट्ट पद्धतीने जोडले जातील तसेच भारत देशाला पुढे घेऊन जाण्यास मदत होईल. आम्ही जे आज ट्रक भारतात आणले आहेत तर अगदी सुरक्षित आहेत. अगदी नवीन नवीन फीचर्स सोबत आम्ही ट्रक बनवले आहेत तसेच सुरक्षा यंत्रणा सुद्धा चांगल्या प्रकारे बनवण्यात आली आहे .
Share your comments