1. ऑटोमोबाईल

Splendor Plus: अरे वा! 'या' ठिकाणी स्प्लेंडर प्लस मिळतेय फक्त 30 हजारात; जाणुन घ्या याविषयी

Splendor Plus: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये लोक चारचाकींऐवजी दुचाकीने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत, त्यामुळे पैशांची बचत होऊ शकते. जर तुम्ही दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Hero Splendor Plus

Hero Splendor Plus

Splendor Plus: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये लोक चारचाकींऐवजी दुचाकीने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत, त्यामुळे पैशांची बचत होऊ शकते. जर तुम्ही दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

असं म्हणण्यापेक्षा ही बातमी तुमच्यासाठी वरदान आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो सध्या दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, जर तुम्हाला हिरो स्प्लेंडर प्लस बाईक घ्यायची असेल तर अजिबात उशीर करू नका. आजकाल या बाइकवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. तुम्ही फक्त 33,000 रुपये देऊन हिरो स्प्लेंडर खरेदी करू शकता, ज्यामध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी तुमचे मन जिंकतील.

त्यामुळे या अप्रतिम ऑफरचा लाभ घेण्यास उशीर करू नका. स्प्लेंडर प्लस बाईकचे मायलेज देखील चांगले आहे शिवाय गाडीचे लुक देखील खूपच चांगले आहेत यामुळे स्प्लेंडर प्लस बाईक ग्राहकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. 

जाणून घ्या बाईकचे फीचर्स आणि किंमत

मित्रांनो शोरूममधून स्प्लेंडर प्लस बाईक नव्याने खरेदी करायची असेल तर आपणास जवळपास 1 लाख रुपये मोजावे लागतात. मात्र येथे नमूद केलेल्या ऑफरनुसार, तुम्ही 33,000 रुपयांत ही भन्नाट बाइक खरेदी करू शकता.

Hero Splendor Plus वर आजची ऑफर BIKES24, सेकंड हँड दुचाकी विकणाऱ्या वेबसाइटने दिली आहे, ज्याने ही बाइक आपल्या साइटवर पोस्ट केली आहे आणि गाडीची किंमत 33 हजार रुपये ठेवली आहे. फक्त खरेदीला उशीर करू नका, कारण कंपनी किंमत आणखी वाढवू शकते.

दुचाकीचे मॉडेल कोणत्या वर्षाचे आहे 

वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, या बाईकचे मॉडेल 2014 चे आहे. या Hero Splendor Plus ची मालकी प्रथम आहे आणि त्याची नोंदणी DL 12 RTO कार्यालय, दिल्ली येथे आहे. या बाईकच्या खरेदीवर कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी योजना दिली जात आहे, सोबतच सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी प्लॅनही दिला जाणार आहे.

या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, जर तुम्ही ही बाईक खरेदी केली आणि तुम्हाला ती सात दिवसांच्या आत आवडली नाही, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता. बाईक परत केल्यानंतर, कंपनी कोणतेही प्रश्न किंवा कपात न करता तुमचे संपूर्ण पेमेंट तुम्हाला परत करेल.

English Summary: Splendor Plus: Wow! At this place you can get Splendor Plus for only 30 thousand; Learn about it Published on: 03 June 2022, 04:03 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters