1. ऑटोमोबाईल

Splendor Plus: 33 हजारात खरेदी करा हिरो स्प्लेंडर प्लस; जाणुन घ्या 'या' भन्नाट ऑफरविषयी

नवी मुंबई: देशातील नामांकित दुचाकी वाहन कंपन्यांमध्ये गणली जाणारी हिरो मोटोकोर्प कंपनी दररोज नवनवीन बाइक लॉन्च करत असते, ज्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. कोरोनाच्या काळात ऑटोमोबाईल कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, ज्याची भरपाई करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Hero Splendor Plus Bike Offer

Hero Splendor Plus Bike Offer

नवी मुंबई: देशातील नामांकित दुचाकी वाहन कंपन्यांमध्ये गणली जाणारी हिरो मोटोकोर्प कंपनी दररोज नवनवीन बाइक लॉन्च करत असते, ज्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. कोरोनाच्या काळात ऑटोमोबाईल कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, ज्याची भरपाई करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे.

दरम्यान, हिरो कंपनी आपली विक्री वाढवण्यासाठी Hero Splendor बाईकवर बंपर ऑफर्सही देत ​​आहे. तुम्ही लवकर खरेदी करून ऑफरचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो तुम्हाला जर हिरो स्प्लेंडर प्लस बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही ही बाईक अतिशय कमी किंमतीत खरेदी करू शकता.

आता तुम्ही हिरोची स्प्लेंडर प्लस बाईक 33,000 रुपयांना खरेदी करू शकता. बाईकचे मायलेज देखील ग्राहकांची मने जिंकणारे आहे, ही गाडी खरेदी करून तुम्ही मोठी रक्कमही वाचवू शकता.

काय आहे स्प्लेंडर बाइकची किंमत

शोरूममधून ऑटो बाजार स्प्लेंडर प्लस बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 65,610 ते 71,470 (एक्स शोरूम किंमत) रुपये खर्च करावे लागतील, परंतु येथे नमूद केलेल्या ऑफरनुसार तुम्ही 33,000 रुपयांमध्ये बाइकचे मालक होऊ शकता.

हिरो स्प्लेंडर प्लस वर आजची ऑफर सेकंड हँड टू व्हीलर खरेदी करणार्‍या वेबसाइट BIKES24 ने दिली आहे ज्याने ही बाइक आपल्या साइटवर पोस्ट केली आहे आणि किंमत 33 हजार रुपये ठेवली आहे. फक्त खरेदीला उशीर करू नका, कारण कंपनी किंमत आणखी वाढवू शकते.

बाईकची वैशिष्ट्ये जाणून घ्या

वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, या बाईकचे मॉडेल 2014 चे आहे आणि ती आतापर्यंत 77 किमी धावली आहे. या Hero Splendor Plus ची मालकी प्रथम आहे आणि त्याची नोंदणी DL 12 RTO कार्यालय, दिल्ली येथे आहे. या बाईकच्या खरेदीवर कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी योजना दिली जात आहे, सोबतच सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील दिली जातं आहे.

या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, जर तुम्ही ही बाईक खरेदी केली आणि तुम्हाला ती सात दिवसांच्या आत आवडली नाही, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता. बाईक परत केल्यानंतर, कंपनी तुम्हाला कोणतेही प्रश्न किंवा कपात न करता तुमचे संपूर्ण पेमेंट परत देईल.

English Summary: Splendor Plus: Buy Hero Splendor Plus for 33 thousand; Learn about the 'Ya' Bhannat offer Published on: 26 May 2022, 04:08 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters