मारुती सुझुकी ही कार निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून मारुती सुझुकीचे सर्वच मॉडेल ग्राहकांच्या पसंतीचे आहेत. परवडणाऱ्या किमतींमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्ये देण्यामध्ये मारुती सुझुकीचा हातखंडा आहे. याच पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी ने बलेनो प्रीमियम हॅचबॅक बलेनो आणि सहा सीटर प्रीमियम एमपीव्ही एक्सएल 6 चे सीएनजी मॉडेल लॉन्च केले आहे.
या दोन्ही कारचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या नेक्सा श्रेणीतील पहिल्या कार असून सीएनजी प्रकारात लॉन्च करण्यात आल्या.
किती आहे मायलेज?
जर आपण मायलेज बद्दल विचार केला तर मारुती बलेनो सीएनजीला 30.61 कीमी पर किलो मायलेज मिळेल. तर मारुती एक्सएल 6 सीएनजी 26.32 कीमी पर किलोचे मायलेज देईल. मारुती सुझुकी बलेनो सीएनजी मध्ये सात इंच स्मार्ट प्ले टच स्क्रीन इन्फोटेनमेन्ट सिस्टम, व्हाईस असिस्टंट, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी तसेच सुझुकी कनेक्ट, सीएनजी विशिष्ट स्क्रीन आणि सहा एअरबॅग्स इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
एक्सएल 6 सीएनजी मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्रूज कंट्रोल तसेच सुझुकी कनेक्ट, तसेच चाइल्ड सीटसह 7 इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.
मॉडेलनिहाय किंमत
1- मारुती बलेनो ( डेल्टा सीएनजी )- किंमत आठ लाख 28 हजार रुपये
2- मारुती बलेनो( जेटा सीएनजी)- किंमत नऊ लाख एकवीस हजार रुपये
3- एक्सएल 6( जेटा सीएनजी) किंमत बारा लाख 24 हजार रुपये
विशेष म्हणजे हे तीनही प्रकार त्यांच्या पेट्रोल मॉडेल पेक्षा 95 हजार रुपयांनी महाग आहेत. या सर्व दिल्लीच्या एक्स शोरूम किंमत आहेत.
नक्की वाचा:Bike News: 'Vida' आहे हीरो मोटोकॉर्पची पहिली ई स्कूटर, एका चार्जवर धावणार 165 किमी
Share your comments