1. ऑटोमोबाईल

Mahindra SUV: महिंद्राच्या 4 जबरदस्त एसयूव्ही कार बाजारात धमाका करण्यासाठी सज्ज; या गाड्यांचा आहे समावेश

Mahindra SUV: महिंद्रा कंपनीच्या अनेक गाड्या बाजारात येण्यासाठी सज्ज आहेत. ग्राहक या गाड्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच महिंद्रा कंपनी लवकरच बाजारामध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. तसेच सध्या आता महिंद्राच्या ५ जबरदस्त एसयूव्ही कार बाजारात धमाका करण्यासाठी सज्ज आहेत.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
Mahindra SUV Cars

Mahindra SUV Cars

Mahindra SUV: महिंद्रा कंपनीच्या अनेक गाड्या बाजारात येण्यासाठी सज्ज आहेत. ग्राहक या गाड्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच महिंद्रा (Mahindra) कंपनी लवकरच बाजारामध्ये इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च करणार आहे. तसेच सध्या आता महिंद्राच्या ५ जबरदस्त एसयूव्ही कार (SUV car) बाजारात धमाका करण्यासाठी सज्ज आहेत.

भारतातील एसयूव्ही सेगमेंटबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. टाटानंतर आता महिंद्राही या सेगमेंटवर पूर्णपणे नजर ठेवून आहे. हे पाहता महिंद्रा लवकरच एक-दोन नव्हे तर 5-5 नवीन SUV कार लॉन्च करणार आहे. महिंद्रा येत्या काही वर्षांत पारंपारिक इंधनासह पाच इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Scorpio N आणि XUV700 च्या जबरदस्त विक्रीनंतर, महिंद्रा पूर्णपणे SUV सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहे. जाणून घेऊया ती पाच वाहने कोणती आहेत, जी महिंद्रा येत्या काही दिवसांत लॉन्च करणार आहे.

लम्पी रोग रोखण्यासाठी पोलिसांनी उचलले मोठे पाऊल; लादले हे निर्बंध

1. महिंद्रा बोलेरो निओ प्लस

रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा येत्या काही महिन्यांत बोलेरो निओ प्लसचे नवीन मॉडेल सादर करू शकते. कंपनी ही SUV 2.2 लिटर चार सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह देत आहे. जे जास्तीत जास्त 120PS पॉवर जनरेट करते. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ऑफर केले जाऊ शकते.

2. महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

कंपनी काही नवीन अपडेट्ससह XUV300 सादर करू शकते. असे मानले जात आहे की ही कार वर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीच्या महिन्यात सादर केली जाऊ शकते. कंपनी ही कार टर्बो चार्ज्ड पेट्रोल इंजिनसह देऊ शकते.

पालक लागवड करून 20 दिवसांत करा 1 लाखांची कमाई; वापरा ही नवीन पद्धत

3. 5 डोर महिंद्रा थार

असा विश्वास आहे की महिंद्रा जानेवारी 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये आपली 5-दरवाजा महिंद्रा थार सादर करू शकते. कंपनी या कारचा ग्लोबल प्रीमियर करू शकते. अहवालानुसार, कंपनी नवीन थारचा व्हीलबेस वाढवू शकते, तर सध्याचे 3 दरवाजे 5 दरवाजे केले जातील.

4. महिंद्रा XUV400

कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली पहिली इलेक्ट्रिक कार XUV400 चे अनावरण केले आहे. येत्या काही महिन्यांत कंपनी लवकरच ते ग्राहकांना सादर करणार आहे. ही कार थेट टाटाच्या नेक्सॉनशी टक्कर देईल. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा चार्जिंगमध्ये 456 किमी प्रवास करेल. 0 ते 80 टक्क्यांपर्यंत ही कार अवघ्या 50 मिनिटांत चार्ज करता येते.

महत्वाच्या बातम्या:
इंजिनिअर दादा तुमचा नादच खुळा! मन की बात मधून प्रोत्साहित होत पिकवले ड्रॅगन फ्रूट; कमावतोय लाखों
आज सुनावणी; संजय राऊतांना जामीन मिळणार?

English Summary: Mahindra SUV: Mahindra's 4 powerful SUVs ready to hit the market Published on: 19 September 2022, 02:10 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters