Cheapest Cars In India : या वर्षात आपल्या देशात अनेक कार (Car) लॉन्च झाल्या आहेत आणि आणखी अनेक गाड्याही लॉन्च होणार आहेत. तुम्हीही नवीन कार (New Car) खरेदी करणार असाल तर, आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेत 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या काही उत्तम कारबद्दल सांगणार आहोत.
यातील काही लॉन्च झाले आहेत तर काही लवकरच लॉन्च होणार आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी भारतातील सर्वात स्वस्त कार कुठली याविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग पाहूया या गाड्यांची संपूर्ण यादी.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara)
मारुती सुझुकी आपली बहुप्रतिक्षित कार ग्रँड विटारा या सप्टेंबर महिन्यात लॉन्च करणार आहे. या कारची किंमत 9.35 लाख ते 19 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
मारुतीची ही कार टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरप्रमाणेच ग्लोबल सी प्लेटफॉर्म वर बनवण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 28 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे आणि ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टम देखील मिळेल.
नेक्स्ट-जनरल Hyundai Verna
नेक्स्ट-जनरल Hyundai Verna ची नुकतीच चाचणीत पाहायला मिळाली आहे. कंपनी ही सेडान कार पुढील वर्षी लाँच करू शकते. कारचे डिझाईन कंपनीच्या नवीन Elantra आणि Sonata च्या जागतिक आवृत्त्यांसारखे आहे. सध्याच्या मॉडेलपेक्षा या कारच्या इंटिरिअरमध्ये लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा आहे. ही कार ADAS सुरक्षा प्रणालीने सुसज्ज असू शकते.
मारुती सुझुकी ब्रेझा
मारुतीने ही कार नुकतीच काही काळापूर्वी लॉन्च केली असून लोकांना ही कार खूप आवडली आहे. कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 101.65 bhp पॉवर जनरेट करते.
ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 20.15 किमी धावू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख ते 13.96 लाख रुपये आहे.
Share your comments