देशात सर्वत्र इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) वाढत्या किमतींमुळे आता देशात स्वस्त आणि इलेक्ट्रिक मोटरसायकलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. इंधन दरवढीवर हा एक चांगला पर्याय असल्याचे जाणकार देखील आपले मत व्यक्त करत आहेत. विशेष त्यांची किंमतही कमी आहे आणि मायलेजही (Mileage) चांगले आहे.
मात्र असे असले तरी अनेकांना पेट्रोल बाईक (Petrol Bikes In India) चालवणे विशेष पसंत असते. यामुळे आज आम्ही दमदार मायलेज देणाऱ्या देशातील टॉप पेट्रोल बाईकची यादी घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
50 हजारात मिळणाऱ्या देशातील टॉपच्या पेट्रोल बाइक्स
बजाज सीटी 100
बजाज ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नामांकित कंपनी म्हणून उदयास आली आहे. या कंपनीची CT 100 ही सर्वात स्वस्त बाइक म्हणुन ओळखली जाते. ही बाईक इलेक्ट्रिक स्टार्ट मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 32,000 रुपये आहे जी टॉप मॉडेलसाठी 60941 रुपयांपर्यंत जाते.
या बाईकचा समावेश लो बजेट अंतर्गत येणाऱ्या बाइक्समध्ये करण्यात आला असून यासोबत 102 सीसी इंजिन देण्यात आले आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 90 किमी मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.
TVS स्पोर्ट
Tvs ही देखील भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक विश्वसनीय आणि जुनी कंपनी आहे. TVS कंपनीची TVS Sport ही एक स्टायलिश बाईक आहे ज्यामध्ये काही चांगले फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये 99.7 cc इंजिन देण्यात आले आहे. जे की 7.8 PS पॉवर आणि 7.5 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकचा पुढचा भाग टेलिस्कोपिक फोर्क्ससह येतो आणि मागील भाग ट्विन शॉक अबजोर्बर्ससह येतो. ही बाईक 75 किमी पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 35,990 रुपयांपासून सुरू होते आणि 66,150 रुपयांपर्यंत जाते.
हिरो एचएफ डिलक्स
Hero कंपनी देशातील अग्रगण्य मोटोकोर्प कंपनीपैकी एक आहे. या कंपनीची Hero HF Deluxe ही बाईक भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक खपत होणाऱ्या गाड्यांच्या यादीत येते. ही बाईक देशात खूप पसंत केली जात असून ती 5 प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बाईकमध्ये 97.2 CC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.36 PS पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.
ही बाईक 82.9 किमीपर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 38,900 रुपयांपासून सुरू होते आणि 65,170 रुपयांपर्यंत जाते. यामध्ये इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम, 5-स्पोक अलॉय व्हील्स आणि हेडलाईट ऑन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
बजाज प्लॅटिना 100
बजाज ही एक प्रमुख दुचाकी निर्माता कंपनी आहे. या कंपनीची प्लॅटिना 100 ही एक सदाबहार बाईक म्हणुन ओळखली जाते. खरं पाहता बजाज कंपनीची ही बाईक सर्वात स्वस्त बाइक्सपैकी एक आहे जी 2005 मध्ये देशात पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली होती आणि कंपनीने आतापर्यंत या बाइकच्या 5 लाख युनिट्सची विक्री केली आहे. ही बाईक किक-स्टार्ट आणि इलेक्ट्रिक-स्टार्ट व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 39,987 रुपये आहे जी टॉप मॉडेलसाठी 65,056 रुपयांपर्यंत जाते. बाईकसोबत 102 सीसी इंजिन देण्यात आले असून 1 लिटर पेट्रोलमध्ये बाइक 90 किमी चालवता येते. अर्थातचं ही बाईक दमदार मायलेजसाठी ओळखली जाते.
Share your comments