सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असताना पाहायला मिळत आहे. सर्व सामान्य लोकांना महागाईच्या कळा सोसाव्या लागत असतानाच मुंबईकरांना पुन्हा महागाईचा मोठा झटका बसला आहे. माहितीनुसार प्रत्यक्षात, महानगरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) च्या किमतीत काल मंगळवारी (12 जुलै) मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील महानगर गॅस लिमिटेडने मंगळवारी शहरात सीएनजीच्या दरात प्रति किलो 4 रुपये आणि पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ केली. विशेष म्हणजे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढण्यामागे वाढीव किंमत आणि रुपयाचे अवमूल्यन हे कारण असल्याचे निदर्शनात आले आहे.
हे ही वाचा: शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी करा फक्त 'हे' काम; लाखों रुपयांनी वाढणार उत्पन्न..
मुंबईत CNG - PNG वाढलेली किंमत –
13 जुलैपासून मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजी महाग झाले आहेत. सध्याची नवीन किंमत आपण पाहिली तर मुंबईत सीएनजीची (CNG) किंमत 80 रुपये प्रति किलो आहे, तर पीएनजीची (PNG) किंमत 48.50 रुपये आहे.
हे ही वाचा: कामठी सोसायटीच्या चेअरमन पदी गणेश आरडे यांची निवड
CNG - PNG किमती का वाढल्या?
महानगर गॅस लिमिटेडने एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, "घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने MGA च्या उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”.
सध्या घरगुती एलपीजी सिलिंडर देखील महाग झाला आहे. अलीकडेच प्रति सिलेंडर 50 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत 153 रुपयांवर गेली होती. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करुन सर्वसामान्यांना महागाईची झळ बसली आहे.
हे ही वाचा: रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; लाभार्थ्यांना होणार फायदाच फायदा..
Share your comments