
milk from farmers rate of 80-100 rupees liter (image google)
हिमाचल सरकारने म्हैस आणि गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात निर्णय घेतला आहे. यामुळे हिमाचलमध्ये खरेदीदर आता ८०-१०० रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सध्या दुधाचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत आला असताना आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार कांगडा जिल्ह्यातील डगवार येथे २५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक दूध प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी केली.
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या सहकार्याने दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला जाईल. या प्लांटची क्षमता १ लाख लिटर ते ३ लाख लिटर इतकी असेल, त्यात चांगल्या दर्जाचे दुधाचे पदार्थही तयार करण्यात येणार आहेत.
डाळिंब खरेदीत १३ लाखांची फसवणूक, एकाला अटक
या मिशनसाठी हिमाचल प्रदेशला सर्वतोपरी मदत करतील. एनडीडीबी प्लँटच्या संचालनासाठी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विपणनासाठी स्वखर्चाने दोन सल्लागार देखील देईल, असे निवेदनात म्हटले आहे.
गणेश कारखाना निवडणुकीत विखे पिता-पुत्रांना धक्का! आमदार निलेश लंके म्हणाले, लोकसभा अजून बाकी...
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये गाईचे दूध ८० रुपये प्रतिलिटर आणि म्हशीचे दूध १०० रुपये लिटर दराने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने राज्य सरकार वाटचाल करत आहे.
बोगस बियाणे, खत विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ विक्रेत्यांना दणका, सातारा कृषी विभागाकडून परवाने निलंबित
राज्याला जागतिक दर्जाचे 'ड्रोन हब' बनवणार, देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना...
या पक्ष्यापासून कमवा 8 ते 10 लाख रुपये, जाणून घ्या खासियत
Share your comments