कोणती कोंबडी ठरेल तुमच्या फायद्याची; जाणून घ्या ! गावरान कोंबड्याच्या प्रजाती

03 February 2021 07:59 PM By: KJ Maharashtra
गावरान कोंबड्या

गावरान कोंबड्या

शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई, म्हशी, शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात यापैकी कुक्कुटपालन हे कमी जागेत करता येणाऱ्या व्यवसायापैकी आहे. जर आपण गावरान कोंबड्यांचा पालनाचा व्यवसाय केला तर आपल्या कमाईत वाढ सहज होऊ शकते.

जेव्हा आपण गावरान अंडी उत्पादनाचा विचार करतो, तेव्हा काही विशिष्ट जाती आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यापैकी  RIR ( ऱ्होड आइलैंड रेड ही एक प्रजाती गावरान कोंबड्यांमध्ये प्रसिद्ध आहे. पण अंड्याचे उत्पादन मात्र उशिरा सुरु होते. गावरान अंड्यांना बाजारात आणि रिटेल विक्रीत अधिक दर मिळत असतो. ही कोंबडी आपल्या एका चक्रात २२० ते २५० अंडी देत असते. गावरान कोंबडींपैकी एक जात आहे, ती म्हणजे ब्लॉक अस्ट्रॉलॉर्प ही ब्रीड तीन महिन्यात २ किलोपर्यंत वजन वाढवत असते. अंडे उत्पादनासाठी हे ब्रीड चांगले आहे पण ऱ्होड आयलॅड या प्रजातीपेक्षा मात्र कमी अंडी देत असते. ब्लॉक अस्ट्रॉलॉर्प ही ब्रीड १६० ते २०० अंडी देत असते.

ग्रामप्रिया – ही एक ब्रीड चांगली आहे. या जातीतील कोंबड्या १८० ते २०० अंडी देतात.

देहलम रेड कोंबडी  - या जातीच्या कोंबड्या २०० ते २२० अंडी प्रत्येक वर्षाला देत असतात.

गिरीराज कोंबडी  - या जातीच्या कोंबड्या दोन महिन्यात एक किलो इतक्या वजनाच्या होत असतात. या कोंबड्या मांस विक्रीसाठी फायदेशीर ठरतात. तर अंडे उत्पादनासाठी या जातीच्या कोंबड्या मात्र थोड्या इतर जातींपेक्षा आपल्याला महागड्या ठरतात. कारण या जातीच्या कोंबड्या एका चक्रात १५० अंडी देत असतात.

 

वनराज – या जातीच्या कोंबड्या दोन महिन्यात एक किलो वजनाच्या होत असतात. पण अंडी मात्र इतर जातींपेक्षा कमी देतात. एका वेतात १२० ते १६० अंडी देतात.

कड़कनाथ – ही जात सर्वाधिक प्रसिद्ध अशी जात आहे. या कोंबडीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने या कोंबड्यांना विशेष मागणी असते. पण या जातीच्या कोंबड्या इतर जातीच्या मानाने कमी वेगात वजन वाढवत असतात. पाच महिन्यात या कोंबड्याचे वजन फक्त एक किलो होत असते. तर एका चक्रात या कोंबड्या फक्त ६० अंडी देतात.कुक्कुट पालन करत असताना जातीची निवड ही तुम्ही कोणत्या मार्केट साठी व्यवसाय करू इच्छिता यावर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी मुक्त संचार पद्धत अवलंबिल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.

मुक्त पद्धतीने संभाळ केल्यास 100 पक्षी अगदी कमी वेळ आणि भांडवल खर्च करुन व्यवसाय सुरु करता येतो. एक दिवसाची पिल्ले विकत घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता.

chicken native chickens giriraj hens Gavaran hens गावरान कोंबड्या कुक्कुटपालन poultry ग्रामप्रिया Grampriya गिरीराज कोंबडी
English Summary: Which chicken will be to your advantage; Learn the species of Gavaran hens

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.