1. पशुधन

शेळीच्या प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापर

काही लोकांना दुधासाठी मादी शेळी पाहिजे असते तर काही लोकांना मांस साठी नर बोकड पाहिजे असते आणि यासाठी शुक्राणूची लिंग चाचणी तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. कृत्रिम रेतन केलेली जी शेळी असते त्या शेळीला मादी का नर जन्माला येणार असते हे माहीत नसते आणि याच वेळी जर वीर्य प्रत्यारोपण करण्याच्या वेळी करडाचे लिंग कोणते असणार त्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
goat

goat

काही लोकांना दुधासाठी मादी शेळी पाहिजे असते तर काही लोकांना मांस साठी नर बोकड पाहिजे असते आणि यासाठी  शुक्राणूची  लिंग चाचणी  तंत्रज्ञान  फायदेशीर ठरते. कृत्रिम  रेतन केलेली जी शेळी असते त्या शेळीला मादी का नर जन्माला येणार असते हे माहीत नसते आणि याच वेळी जर वीर्य प्रत्यारोपण  करण्याच्या वेळी  करडाचे लिंग कोणते असणार त्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

हे तंत्रज्ञान x आणि y या लिंग सूत्रावर अवलंबून आहे. दोन्ही सूत्रावर अवलंबून असणाऱ्या डी.एन.ए च्या संख्येत २.८ ते ४ टक्के फरक असतो. या यंत्राद्वारे नर करडे तयार होण्याची शक्यता ८० टक्के असते तर मादी करडे तयार होण्याची शक्यता ९४ टक्के असते.

फायदे-

१.फ्लोसाईटोमेट्री या यंत्राद्वारे जी लिंग निश्चिती केली आहे त्याचे शुक्राणू वेगवेगळ्या स्ट्रॉ बनवून गोठीत वीर्य केंद्रात साठवून ठेवले जातात.

२.याचा उपयोग आपल्याला ज्या लिंगाची करडे पाहिजेत त्यासाठी होतो. सध्या हे संशोधन विकत देशात झाले असून अनेक शेतकरी याचा फायदा घेत आहेत.

माजाचे एकत्रीकरण-

कृत्रिम रेतनाची सर्वात मोठी समस्या म्हणजे शेळ्यांमधील योग्य वेळी माजाची वेळ ठरवणे, कारण माजाची वेळ आपण लक्षणांवरून ठरवतो. मात्र कृत्रिम   रेतन हे  योग्य वेळी माजाची वेळ ओळखू शकत नसल्याने त्यामध्ये पाहिजे असे प्रमाणता झालेली नाही.माजाचे एकत्रीकरण म्हणजे एकाच वेळी कळपातील अनेक शेळ्या संप्रेरक करून माजावर आणणे आणि यानंतर कृत्रिम रित्या फळवणे.

हेही वाचा:दुधातील फॅट वाढवण्यासाठी आवश्यक आहे आहार आणि जनावरांची योग्य निगा

कृत्रिम रेतन करण्याचे वेळापत्रक आपण आपल्या मर्जीनुसार ठरवू शकतो तर माजाचे बाह्य लक्षणे न शोधता एकाच वेळी अनेक शेळ्यांना निश्चित वेळी कृत्रिम रेतन चा  वापर करून  फळवू शकतो.माजच्या एकत्रितपणे केल्यामुळे एकाच वेळी जास्तीत जास्त शेळ्यांचे प्रजनन होते. शेळीच्या  प्रजनन  स्थितीमुळे  खाद्याचे चांगल्या  प्रकारे नियोजन  करता येत. तसेच  ज्या  वारंवार उलटणाऱ्या शेळ्या असतात किंवा अनियंत्रित माजावर आलेल्या शेळ्या यावर याचा उपयोग होतो.माजाचे एकत्रीकरण हे जे तंत्रज्ञान आहे ते शेळी मालकांची खूप उपयोगाचे आहे मात्र त्यासाठी तुम्ही पशुवैद्यकीय मार्गदर्शन घेतले पाहिजे.

कृत्रिम रेतन तंत्र -

गाई तसेच म्हशींचे प्रजनन क्षमता व अनुवंशिकता अधिक वेगाने वाढविण्यासाठी कृत्रिम रेतन तंत्रज्ञान चा वापर जास्त झाला आहे आणि तो यशस्वी देखील झालेला आहे.कृत्रिम रेतन चा वापर करून आवण जातिवंत नराचे ५० टक्के गुण शेळीच्या पुढील पिढीस प्राप्त होतात.

English Summary: Use of technology for goat breeding Published on: 26 August 2021, 07:17 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters