1. पशुधन

दुधातील फॅट वाढवण्यासाठी आवश्यक आहे आहार आणि जनावरांची योग्य निगा

दुधाचा व्यवसाय आपण करत असाल तर आपल्याला दुभत्या जनावराची विशेष काळजी घ्यावी लागते. दुधातील स्निग्धांश हा प्रतवारी च्या दृष्टीने एक महत्त्वाचे घटक आहे. दुधाची चव बऱ्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांश यावर अवलंबून असते. दुधाची किंमत फॅटच्या प्रमाणावर ठरवली जाते. महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधात किमान 3.8 तर म्हशीच्या दुधाचा फॅट सहा असणे आवश्यक असते. त्यापेक्षा कमी फॅट असल्यास ते दूध अप्रमाणित समजले जाते. त्यामुळे दुधाचा फॅट वाढविण्यासाठी चे उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
growth milk production remedy

 दुभत्या जनावरांचा आहार कसा असावा?

 जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश अवश्य करावा. उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा. उसाचे वाढे,भाताचा पेंढा,गव्हाचे काड असा निकृष्ट दर्जाचा चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील स्निग्धांश  कमी होतात. गाई-म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंड,मका भरडा, तुर,हरभरा,मुग,चुनी,गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.

 या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा

 जर आपल्याकडे जास्त दूध उत्पादन देणाऱ्या पण दुधातील स्निग्धांश कमी असणाऱ्या गाई असतील व अधिक उत्पादन यामुळे आपण त्यांचा सांभाळ करत असल्यास त्यांच्यापुढील पिढ्या जर्सी जातीचे रेतन करून तयार कराव्यात.त्यामुळे दूध उत्पादनाबरोबर दुधाचे फॅटचे प्रमाण देखील वाढते.दूध काढण्यातील अंतर समान असावे. जर सकाळी सहा वाजता दूध काढले सायंकाळीसहा वाजताच दूध काढावे.अंतर वाढले तर दूध वाढते पण फॅट कमी होतात.दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ पाण्याने धुवावीम्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढतेव दुधातील स्निग्धांश यांच्या प्रमाणात देखील वाढ होते. दूध जास्तीत जास्त सात मिनिटांमध्ये काढावे.

दूध काढताना पुरेशी स्वच्छता बाळगावी म्हणजे कासदाह सारखे आजार दुधाळ जनावरांना होणार नाही. कासदाह झाल्यास पशुतज्ज्ञांकडून त्वरित उपचार करावेत.दुधाळ जनावरांना शक्य असल्यास मोकळे सोडावे.जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल.व्यायाम झाल्यामुळे गाईच्या दूध उत्पादनातव फॅटच्याप्रमाणात वाढ झालेली दिसते. जास्त वयस्कर जनावरे, सातव्या वीता च्या पुढे दुधाळ जनावरे गोठ्यात ठेवू नयेत.

English Summary: various way of growth of milk production Published on: 26 August 2021, 01:26 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters