लम्पी आजारावर लास उपलब्ध असून घाबरण्याची गरज नाही. लम्पी हा आजार आयुर्वेद उपचार पद्धतीने देखील जनावरांचा हा आजार बरा होतो, असं जाणकारांनी सांगितलं आहे.काय आहे देशी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धत?लम्पी त्वचा रोगावर कोणतीही ठोस उपचार नाही. केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करू शकते. लम्पी रोगाची लागण झालेल्या गायी आणि म्हशींवर आपण देशी आणि
आयुर्वेदिक उपचार पद्धत वापरू शकतात. लम्पी आजारावर घरगुती उपचाराने कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते,याविषयी आम्ही आपल्याला माहिती देत आहोत.
हे ही वाचा - बेलाचे हे आयुर्वेदिक फायदे माहिती करून घ्याच, तुमचा मोठा खर्च वाचेल!
गायी आणि म्हशीला संसर्ग झाल्यास हे पारंपरिक उपायही केले तर बऱ्यापैकी आराम मिळू शकतो. 10 सुपारीची पाने, 10 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम मीठ आणि आवश्यकतेनुसार गूळ, हे संपूर्ण साहित्य बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी. हे
मिश्रण जनावरांना थोड्या-थोड्या प्रमाणात खायला द्या. पहिल्या दिवशी दर तीन तासांनी जनावरांना एक डोस द्यावा. दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिवसांतून फक्त 3 डोस द्यावे.गुरांच्या अंगावर झालेल्या जखमेवर लावा हे मिश्रण1 मूठभर मेथीची पाने, 10 पाकळ्या लसूण, 1 मूठ कडुनिंबाची पाने, 1 मूठभर मेंदीची पाने, 500 मिली नारळ किंवा तीळ, 20 ग्रॅम हळद, 1 मूठभर तुळशीची
पानांची पेस्ट तयार करावी. यानंतर त्यात खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल टाकून ते उकळून घ्यावे. नंतर पेस्ट थंड झाल्यानंतर गुरांच्या अंगावर झालेल्या जखमांवर लावावे. जखमेत किडे दिसल्यास प्रथम कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे. तुम्ही सीताफळची पाने बारीक करून त्यांची पेस्ट तयार करून देखील लावू शकतात.
महत्वाचे म्हणजे आठ दिवसातून एकदा गाई-म्हशीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना बोलवावे आणि वेळोवेळी त्याचा सल्ला घ्यावा.
Share your comments