पशुपालन व्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर जनावरांचा आहार व्यवस्थापन आणि उत्तम आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. जर आपण जनावरांच्या आरोग्याचा विचार केला तर त्याच्या मुळाशी सगळ्यात आगोदर जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर विविध प्रकारचे लसीकरण व जनावरांच्या आजारांबाबत सूक्ष्म निरीक्षण ठेवणे फार गरजेचे असते.
जर आपण आत्ता सध्याच्या वातावरणाचा विचार केला तर पावसाचे दिवस असल्याने सगळीकडे ओलावा व दमट हवामान असल्यामुळे त्याचा परिणाम हा गोठ्यामध्ये काही उपद्रवी कीटकांची वाढ होण्यावर होतो.
आता साधारणता सगळ्यांना माहिती आहे की, अशा वातावरणामध्ये गोठ्यात चिलटे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळे जनावरांना तिवा नावाचा विषाणूजन्य आजार होण्याचा संभव अधिक असतो.
नक्की वाचा:Goat Rearing: शेळीपालनातील 'ह्या'9 बाबी म्हणजे शेळीपालनातील यशाचा आहे पासवर्ड
काय आहे नेमका हा आजार?
या आजाराचा एकंदरीत आपण विचार केला तर जास्त दूध देणाऱ्या व चांगल्या प्रकृतीच्या गायीमध्ये व नर जनावरांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसे पाहायला गेले तर हा आजार जनावरांसाठी प्राणघातक नसला तरी त्याचा परिणाम हा दूध उत्पादन घटीवर व नरांच्या कार्यक्षमतेमध्ये घट होण्यावर दिसून येतो.
या आजाराच्या प्रसाराची कारणे
तसे पाहायला गेले तर चांगल्या प्रकृतीच्या व जास्त दूध देणाऱ्या गाईमध्ये आजार जास्त दिसून येतो परंतु 12 महिन्याच्या आत असलेल्या वासरांना तर याचा प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यामध्ये लक्षणे अतिशय सौम्य दिसतात परंतु पेक्षा जास्त वयाच्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आणि त्याची तीव्रता देखील जास्त प्रमाणात दिसून येते.
ज्या जनावरांना तिवा आजाराची बाधा झाली आहे अशी जनावरे आणि प्रामुख्याने चिलटे या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात करतात. हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूमध्ये असलेल्या वातावरणात जे काही बदल होतात त्यामुळे जनावरांवर प्रचंड प्रमाणात ताण येतो व यावरच या आजाराची एकंदर स्थिती अवलंबून असते.
चिलटे हे अतिशय बारीक असल्यामुळे ते वाराच्या प्रवाहासोबत इकडे तिकडे फेकले जातात व त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात देखील हा आजार पसरण्याची भीती निर्माण होते.
परंतु या आजाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अनेकदा जनावराला हा आजार झाला तरपण आयुष्यभर नवीन संबंधित जनावराला हा आजार होउ शकत नाही. कारण या आजाराच्या विरोधात जीवन भरासाठी रोगप्रतिकारशक्ती संबंधित जनावराच्या शरीरात तयार होते.
Share your comments