1. पशुधन

दूध व्यवसायासाठी मुक्त संचार गोठा ठरतोय फायद्याचा

शेतकरी वर्गाला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी दुधाचा व्यवसाय मदत करतो जे की या व्यवसायामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती चांगली झाली असली तरीही मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी हा व्यवसाय कमी तर काही शेतकऱ्यांनी हा व्यवसाय थांबवलाच आहे. या व्यवसायाला अत्ता मुक्तसंचार गोठा हा पूरक आणि चांगला ठरलेला आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
cow

cow

शेतकरी वर्गाला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी दुधाचा व्यवसाय मदत करतो जे की या व्यवसायामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती  चांगली  झाली  असली  तरीही  मागील  काही  वर्षात शेतकऱ्यांनी हा व्यवसाय कमी तर काही शेतकऱ्यांनी हा व्यवसाय थांबवलाच आहे. या व्यवसायाला अत्ता मुक्तसंचार गोठा हा पूरक आणि चांगला ठरलेला आहे.

पशु खाद्य चा खर्च सुद्धा तितकाच वाढला:

मागील काही वर्षात राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर जर्शी तसेच हॉस्टेल अशा विदेशी जातीच्या गाई उभ्या राहिल्या त्यामुळे जो मुक्तसंचार गोठा होता तो गोठा बंदिस्त झाला आणि यामुळे व्यवस्थापन खर्च देखील वाढला तसेच पशु खाद्य चा खर्च सुद्धा तितकाच वाढला गेला.मागील काही वर्षांपासून पशुखाद्य च्या किमतीचे भाव पार आभाळाला टेकले आहे आणि दुधाचे भाव कमी होत निघाले त्यामुळे दूध व्यवसाय हा तोट्याचा व्यवसाय झाला. अनेक शेतकऱ्यांना खाद्य पैसे च भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थापन खर्च कमी केलेला आहे.

हेही वाचा:शेळीपालनात होईल कृत्रिम रेतनाचा फायदा मिळेल अधिक उत्पन्न

कर्नलवाडी मधील निखिल निगडे यांनी व्यवस्थापन चा खर्च कमी व्हावा म्हणून मुक्तसंचार गोठा चा प्रयोग अवलंबला आहे जे की या प्रयोगातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने निखिल निगडे समाधानी असल्याचे चित्र दिसले आहे.निखिल निगडे दूध व्यवसाय बाबत ज्यावेळी बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितले की पूर्वी आमच्याकडे सहा गाई होत्या आणि त्याला माणसे सुद्धा जास्त लागत होती आणि त्यात आम्ही अडकून बसायचो.दिवसातून त्यांना तीन ते चार वेळा खायला टाकावं लागत असे तसेच पाणी देणे, सारखी स्वछता करणे.

यासाठी मोठे मनुष्यबळ आणि वेळ सुद्धा जात होता. एवढे सगळे करण्यासाठी व्यवस्थापन खर्च जास्त प्रमाणात लागत होता.त्यामुळे आम्ही मुक्तसंचार गोठा चा प्रयोग करण्याचा विचार केला आणि।तो आज यशस्वी ठरला. जसे की आज आमच्याकडे ४० गायी आहेत जे फक्त तीन माणसे सहजपणे सांभाळत आहेत.जेवढे सहा गाईसाठी व्यवस्थापन खर्च लागत होता तेवढ्या खर्चात १०० गायी चे व्यवस्थापन होऊ शकते आणि दूध व्यवसाय सुद्धा फायद्यात राहील असे फ्यानी सांगितले.निखिल निगडे यांनी सांगितले की ४० गायींना सर्व खर्च जाऊन दरमहा आम्हाला ५० हजार रुपये राहतात. मुक्त संचार गोठा मुळे आमचा जो दुधाचा व्यवसाय बुडत चाललेला होता तो अत्ता नव्याने उभा राहिलेला आहे.

English Summary: This new method boon for the milk business Published on: 30 August 2021, 07:20 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters