शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो त्यासोबतच कुक्कुटपालन आणि शेळीपालन हे दोन व्यवसाय शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. शेळी पालन व्यवसाय तर आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी तसेच नुकत्याच शेतीत आपले नशीब आजमावून पाहणारे नवयुवक मोठ्या प्रमाणात करत आहेत. कारण शेळी पालन हा व्यवसाय अगदी कमीत कमी खर्चामध्ये आणि कमी जागेत करता येणारे व्यवसाय आहे.
परंतु शेळीपालन व्यवसायामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीच्या फायदेशीर शेळ्यांच्या जातींची निवड खूप महत्त्वाची ठरेल.
शेळ्यांच्या जातींची निवड ही विविध निकषांवर आधारित असून हे निकष पूर्ण करणाऱ्या जातीची जर निवड केली तर शेळीपालन व्यवसाय नक्कीच आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करण्यास मदत करू शकतो. यासाठीच आपण या लेखामध्ये शेळ्यांच्या तीन अशा महत्त्वपूर्ण जातींची माहिती घेऊ की त्या शेळीपालनासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरू शकतात.
शेळीपालनासाठी उपयुक्त शेळ्यांच्या जाती
1- सोजत- शेळ्यांची ही जात राजस्थान राज्यातील असून या जातीच्या शेळ्याचा रंग हा पांढरा शुभ्र असतो व डोळ्यावर त्यासोबतच कानावर डाग असतात.
या जातीच्या शेळीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे काही शेळींचे कान हे गुलाबी असतात व अशा गुलाबी कान असलेल्या शेळीला खूप किंमत मिळते. सोजत जातीच्या बोकडांना जास्त किंमत मिळते. खासकरून बकरी ईदच्या निमित्ताने यांना खूप मागणी असते. सोजत जातीच्या नराचे वजन 50 ते 70 किलो तर मादीचे वजन 35 ते 45 किलो असते.
2- मालवा- ही शेळ्यांची जात मध्यप्रदेश राज्यातील असून मध्यप्रदेश येथील भोपाळ तेथे ती खूप प्रसिद्ध आहे. या जातीच्या शेळ्यांचा रंग पांढरा असतो तसेच शेळ्यांना शिंगे असतात. या जातीच्या शेळ्यांच्या नराच्या वजनाचा विचार केला तर ते 50 ते 80 किलो व मादी शेळीचे वजन 40 ते 50 किलो असते. मालवा जातीचा बोकड हा कुर्बानीसाठी सर्वाधिक भारतात प्रसिद्ध आहे. नर बोकडाचे वजन 100 किलो पेक्षा सुद्धा जास्त असते.
3- पतिरा- शेळ्यांची ही जात गुजरात राज्यामध्ये आढळते. या जातीच्या शेळ्या यांचा रंग पांढरा असतो. या जातीच्या शेळ्या यांचे वैशिष्ट्य म्हणजे तोंडावरील गुलाबी छटा व कान गुलाबी असतात.
या जातीच्या नराचे वजन 50 ते 60 किलो व मादी शेळीचे वजन 35 ते 50 किलोपर्यंत असते. पतीरा ही शेळ्यांची जात खूप दुर्मिळ आहे तसेच महागडी व सुंदर म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहे.
नक्की वाचा:उन्हाळ्यात वापरा 'या' टिप्स खास, पोल्ट्री व्यवसाय बहरेल हमखास
Share your comments