1. पशुधन

Poultry: शेतकरी बंधूंनो! कोंबडीपालन करत आहात आणि कोंबड्यांपासून अंड्याचे उत्पादन वाढवायचे आहे तर करा 'या' औषधी वनस्पतींचा उपयोग,मिळेल फायदा

बरेच शेतकरी कुकूटपालन व्यवसाय करतात. आता पोल्ट्री व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप आले असून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये आता व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. परंतु अजून देखील बरेच शेतकरी छोट्या प्रमाणात कुकूटपालन व्यवसाय करतात व हा केला जाणारा कुक्कुटपालन व्यवसाय प्रामुख्याने मांस उत्पादन आणि अंडी उत्पादनासाठी केला जातो. परंतु बऱ्याचदा व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने केले जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
growth egg production tips

growth egg production tips

बरेच शेतकरी कुकूटपालन व्यवसाय करतात. आता पोल्ट्री व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप आले असून कॉन्ट्रॅक्ट  पद्धतीमध्ये आता व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. परंतु अजून देखील बरेच शेतकरी छोट्या प्रमाणात कुकूटपालन व्यवसाय करतात व हा केला जाणारा कुक्कुटपालन व्यवसाय प्रामुख्याने मांस उत्पादन आणि अंडी उत्पादनासाठी केला जातो. परंतु बऱ्याचदा व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने केले जाते.

नक्की वाचा:Goat Species:शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे ना? तर आणा 'या'जातीची शेळी आणि करा सुरुवात, मिळेल बंपर नफा

परंतु काही छोट्या गोष्टींमुळे कोंबड्यांमधील उत्पादनक्षमता कमी होते.  जर आपण कोंबड्यांची अंडी उत्पादनाच्या वयाचा विचार केला तर सतराव्या आठवड्यापासून 72 व्या आठवड्या पर्यंत कोंबडी अंडे देतात.

त्यामुळे कोंबड्यांचा जो काही अंडी उत्पादनाचा कालावधी आहे त्यामध्ये जास्त अंड्यांचे  उत्पादन मिळावे यासाठी काही औषधी वनस्पतींचा चांगला उपयोग होऊ शकतो. याविषयी या लेखात माहिती घेऊ.

 कोंबड्यांमधील अंडी उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पती

1- जीवंती- या औषधी वनस्पतीचा उपयोग जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढविण्यासाठी आणि कोंबड्यांमध्ये अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. या संपूर्ण वनस्पतीचा वापर औषधात केला जातो. यासाठी प्रती पक्षासाठी 0.5 ग्रॅम या प्रमाणात वनस्पतीचे मात्रा असावी.

2- मेथी- मेथी या वनस्पतीची बी म्हणजेच आपण त्याला मेथ्या असे देखील म्हणतो. अंडी उत्पादन वाढवण्यासाठी  अत्यंत उपयुक्त आहे. जर खाद्यातून दहा ग्रॅम प्रति 100 पक्षी अशी खाद्यातून नियमित मात्रा देणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:Poultry: गावरान कोंबड्यांच्या 'या' प्रजाती पाळून करा सुरुवात कुक्कुटपालनाची, मिळेल बक्कळ नफा

3- शतावरी- शतावरी ही औषधी वनस्पती असून आपण शोभेसाठी घराजवळ कुंडीत देखील लावतो. शतावरीचे मूळ औषधात वापरले जाते व या मुळाची पावडर कोंबड्यांच्या खाद्यातून देणे गरजेचे आहे.

कोंबड्यांची कमी झालेली अंडी उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी प्रतिपक्षी 0.5 ग्राम या मात्रेमध्ये शतावरी चा वापर करावा. तसेच पक्षाच्या वयाच्या दहाव्या आठवड्यापासून 0.25 ग्रॅम प्रति पक्षी या मात्रेत या वनस्पतीचा वापर केला तर अंडी उत्पादनात वाढ होते.

 वरील तीनही वनस्पतींचा एकत्रित वापर

यासाठी शतावरी 45 ग्राम,जीवन्ती 45 ग्रॅम व मेथी दहा ग्रॅम हे घटक एकत्र करून बारीक करून घ्यावेत व दहा ग्रॅम प्रति 100 पक्षी या मात्रेत दररोज पक्षांच्या खाद्यातून द्यावे.

हीच एकत्रित औषधी पक्षाच्या वयाच्या 100 आठवड्यापासून दहा ग्रॅम प्रति 500 पक्षी या मात्रेत नियमितपणे दिल्यास अशा पक्षांपासून अंडी उत्पादन जास्तीत जास्त मिळते.

नक्की वाचा:Fish Farming: प्रचंड मागणी असलेल्या 'ग्रास कार्प'चे पालन म्हणजेच मत्स्य व्यवसायातील यशाची पहिली पायरी

English Summary: this is some medicinal plant is useful for growth egg production in hen Published on: 16 October 2022, 04:55 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters