MFOI 2024 Road Show
  1. पशुधन

शेती सोबत मत्स्य व्यवसायातील या '5' संधी देतील तुम्हाला आर्थिक उन्नतीचा मार्ग, वाचा आणि घ्या माहिती

सध्या नैसर्गिक संकटे, अवकाळी पाऊस इत्यादींमुळे शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहणे फार चुकीचे आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड व तंत्रज्ञान आणि अशा जोड व्यवसाय मध्येप्रगती साधत राहणे खूप फायद्याचे ठरणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक

सध्या नैसर्गिक संकटे, अवकाळी पाऊस इत्यादींमुळे शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहणे फार चुकीचे आहे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड व तंत्रज्ञान आणि अशा जोड व्यवसाय मध्येप्रगती साधत राहणे खूप फायद्याचे ठरणार आहे.

जर शेतीपूरक व्यवसायांमध्ये विचार केला तर सर्वात सोपा असलेला व्यवसाय म्हणजे मत्स्यव्यवसाय होय. इतर व्यवसाय प्रमाणे या व्यवसायात देखील थोड्याफार कष्टाची व ज्ञानाची गरज असते. या दोन्ही गोष्टींची सांगड व्यवस्थित घातली ना यश खूप दूर नाही. इतर व्यवसाय प्रमाणेच चिकाटी हा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म या व्यवस्थादेखील हवाच. या लेखामध्ये आपण मत्स्य व्यवसायाला पूरक असे पाच व्यवसाय  पाहणार आहोत ज्यामुळे बेरोजगार तरुणांना एक सुरेख रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

 मत्स्य व्यवसायातील पाच संधी

1- मत्स्यबीज सप्लाय करणे- महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लहान व मोठे मत्स्य तलाव शेततळे बांधण्यात आलेली आहेत. एवढेच नाही तर अनेक लहान-मोठे बंधारे व धरणे आहेत. शेती प्रमाणेच उच्च प्रतीचे मत्स्यबीज योग्य वेळी योग्य प्रमाणात उपलब्ध होणे ही मत्से संवर्धनाची गुरुकिल्ली आहे. मत्स्य व्यवसायाची प्रगती खूप जोरात सुरू असून त्यासोबतच मत्स्यबीजांची ही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे मत्स्यबीज महाराष्ट्रात व भारतात मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून सहजरीत्या उपलब्ध होते. हे मत्स्यबीज मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचवून स्वयंरोजगाराचे चांगले साधन उभा करता येऊ शकते.

2- मत्स्य तलावातील शोभिवंत माशांचे संवर्धन-शेत जमीन असल्यास शेतजमिनीत मत्स्य संवर्धन करता येऊ शकते.यामध्ये गोड्या पाण्यातील संवर्धन युक्त शोभिवंत मासे जसे की गोल्डफिष, एंजल, मोली इत्यादी शोभिवंत मासे संवर्धन करता येतील. या माशांचे बीज घेऊन ते 30 बाय 30 बाय पाच फूट आकाराच्या तळ्यात व तळ्याची खोली साधारण दोन मीटर मध्ये सोडल्यास तीन ते चार महिन्यात बाजारात विक्रीसाठी तयार होतात. बाजारात हव्या असलेल्या आकाराचे बनविल्यास अशा शोभिवंत माशांच्या वाढविलेल्या बिजास बाजारात चांगली किंमत मिळते तसेच शोभिवंत माशांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

3- मत्स्य टाकी बनवणे व विकणे-मत्स्य टाकीला घरात, हॉटेल मध्ये तसेच कॉलेज, दवाखाना आणि मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. मतस्य टाकी बनवणे व त्यात शोभिवंत मासे सोडणे, मत्स्य टाकी वरील निर्देशित केलेल्या ठिकाणी विकल्यास त्यातून चांगला मोबदला मिळू शकतो.

महिला बचत गट व बेरोजगार हा व्यवसाय अतिशय नियोजनबद्ध करू शकता. मत्स्य टाकीला लागणाऱ्या सामानाची व शोभिवंत मासे पाळून ते वाढवणे व जशी गरज लागेल तसे ग्राहकांपर्यंत पोहोचविणे ही यात समाविष्ट आहे.

4- मूल्यवर्धित मच्छी पदार्थ तयार करणे विकणे- कमी दर्जाच्या व स्वस्त मासळी पासून मत्स्य पदार्थ बनवणे या कॅटेगिरीत मोडते. आपण वडापाव, डोसा, पावभाजी व इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या पाहिले आहेत पण मत्स्य पदार्थ बनवून ते गाडीवर विकणे हे फार कमी बघायला मिळते. स्वस्त मासोळी पासून विविध पदार्थ बनवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने मच्छ शेव, मच्छी चकली, मत्स्य वडा व कोळंबी लोणचे इत्यादी पदार्थ बनवले जाऊ शकतात. महिला बचत गट हे पदार्थ बनवून हॉटेल्स, मॉल्स व घराघरापर्यंत पोचवले विक्री करू शकतात.

5- शैक्षणिक क्षेत्रात मासे पुरवणे- महाराष्ट्रामध्ये बरेच कॉलेजेस, शाळा व विविध शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये मत्स्य विज्ञान प्रात्यक्षिकांसाठी लागत असतात. अशा शैक्षणिक संस्थांना गोड्या, खाऱ्या, निमखाऱ्या पाण्यातील मासे पुरविणे हा देखील एक चांगला रोजगार निर्माण करावा व्यवसाय ठरू शकतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Ginger farming : शेतकऱ्याचे संकट काही संपेना; या कारणामुळे आले लागवड हुकली

नक्की वाचा:नाशिक - पुणे रेल्वे साठीच्या पहिल्या जमिनीच्या मोबदल्यात महिला शेतकऱ्यास मिळाले 1 कोटी 1 लाख

नक्की वाचा:वैज्ञानिकांनी विकसित केले भाताचे वैशिष्ट्यपूर्ण वाण, खाऱ्या पाण्यात देखील करता येईल लागवड

English Summary: this is five fishry bussiness give employment chance to unemplyment chance to farmer Published on: 05 May 2022, 04:18 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters