पशुपालन व्यवसाय म्हटले म्हणजे या माध्यमातून मिळणारे दुधाचे उत्पादन हा एक प्रमुख व आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. अनेक शेतकरी म्हैस पालन आणि गाईंचे पालन करतात. जर आपण वाढीव उत्पादनाचा विचार केला तर गोठ्यामधील गाईची जात ही जातिवंत असणे गरजेचे आहे. त्यामुळे दूध व्यवसायासाठी गाईंची निवड करताना खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.
जर आपण गाईंचा विचार केला तर अनेक प्रकारच्या संकरित गाईंचे पालन केले जाते. परंतु यामध्ये अनेक देशी गाई अशा आहेत ज्या संकरित गाईंना देखील तोडीस तोड आहेत
. त्यामुळे देशी गाईंचे पालन देखील खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते. म्हणून आपण या लेखांमध्ये एक अशाच देशी गाईच्या महत्त्वपूर्ण जातीविषयी माहिती घेणार आहोत.जी शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न देऊ शकते.
नक्की वाचा:'लम्पी स्कीन'ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल; मिळणार इतकी रक्कम
लाल कंधारी गाय ठरेल पशुपालकांसाठी वरदान
जर आपण गाईच्या जातींचा विचार केला तर यामध्ये लाल कंधारी ही जात खूप महत्त्वपूर्ण असून ही देशी गाईची जात आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात लाल कंधारी गाईचे पालन केले जाते. विशेष म्हणजे ही गाय महाराष्ट्रातील असल्यामुळे तिला आपल्याकडे हवामान अधिक मानवते असे देखील म्हटले जाते.
त्यामुळे पशुपालक लाल कंधारीचे पालन अगदी सहजरीत्या करू शकतात. जर या गाईचा विचार केला तर ही गाय महाराष्ट्रातील कंधार तालुक्यात अधिक आढळत असल्यामुळे या जातीला लालकंधारी असे म्हटले जाते. तसे पाहायला गेले तर या गाईची किंमत ही गाईचे आरोग्य आणि दूध उत्पादन यावर अवलंबून असते.
परंतु या क्षेत्रातील तज्ञ सांगतात की या गायीची किंमत 40 ते 50 हजारांच्या आसपास असते. लाल कंधारी गाईचे संगोपन कमी खर्चात केले जाऊ शकते तसेच मिळणारे दूध उत्पादन हे जास्त मिळत असल्याने लाल कंधारीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरते. हे गडद तपकिरी तसेच गडद लाल रंगाची असतात व कान लांब असतात.
या क्षेत्रातील जाणकारांच्या मते ही गाय वर्षातील 235 ते 275 दिवस दूध देते. तसेच लाल कंधारी गायीचा भाकड काळ हा 130 ते एकशे नव्वद दिवस असू शकतो. लाल कंधारी जातीच्या गाई या पंचेचाळीस महिन्यात पहिल्यांदा प्रजननास तयार होतात.
Share your comments