शंकरपट खेळावर अन पटांच्या बैलावर जीवापाड प्रेम असलेल्या किनगावराजातील गजाननराव वानखडे यांनी तब्बल ७ लाख ११ हजार रुपये किंमत देऊन मराठवाड्यातील मंठा तालुक्यातील कानफोडी गावातील रमेश राठोड यांच्या 'लक्ष्या' नावाच्या बैलाची खरेदी करून त्याला आपल्या दावणीला बांधला आहे.
ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या शंकरपटावरील गत ७ वर्षांपासूनची असलेली बंदी न्यायालयाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात उठवली अन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या या विशेष आवडीच्या खेळाच्या अर्थकारणानेे वेग धारण केला असल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सुसाट वेगाने 'स्पीड किंग' अशी ख्याती मिळवणाऱ्या लक्ष्याचे आगमन वानखेडे यांनी किनगावराजात केल्याने या परिसरातील शंकरपट प्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे.
किनगावराजातील शंकरपटाचे खास शौकीन असणारे श्री.गजाननराव वानखडे हे स्वतः पोलीस खात्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर नोकरीला आहेत तर त्यांच्या पत्नी आरोग्य विभागात कार्य करतात.मोठा मुलगा शिक्षक तर लहान मुलगा हवाई दलात फ्लाईट लेफ्टनंट या उच्च पदावर आहे.असा ज्याला आपण 'वेल सेटल' परिवार म्हणतो तसा त्यांचा परिवार आहे.असे वैभव प्राप्त असल्यावर आरामशीर जीवन जगू शकणाऱ्या वानखडे यांना मात्र बैलगाडा शर्यतीतच रस आहे.आमचे पूर्वज नंदीचे भक्त असल्याने पिढीजात आम्हाला हा छंद असल्याचे वानखडे यांनी सांगितले.त्यांच्या या आवडीला कुटुंबातील सर्वांचीच मनापासून साथ आहे.
किनगावराजा येथीलच गोपाल सुभाष पाटील यांच्या 'मल्हार' नावाच्या शर्यतीच्या बैलाची तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयात जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील किरण राजपूत यांनी खरेदी केली असल्याची माहिती मिळाली आहे.
मल्हारची खरेदी गोपाल पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी चाळीसगाव येथून १ लाख ३१ हजार रुपयात खरेदी केली होती.अवघ्या दीड महिन्यातच पाटील यांना २ लाख ३४ हजार रुपयांचा नफा मल्हार ने मिळवून दिला आहे.बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणास कशा पद्धतीने चालना मिळते हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
गोपाल पाटील यांची विक्री व राजेवाडी तालुका जिल्हा जालना येथील किरण राजपूत यांची ३ लाख ६५ हजार रुपयांची मल्हारची खरेदी
महत्वाची बाब म्हणजे त्यांचा खुराक सांभाळणे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडन्याजोगे आहे.शर्यतीच्या एका बैलाचा खुराक म्हणजे सकाळ व संध्याकाळ दोन्ही मिळून ८ लिटर दुध,उंड्याच्या मेळवनामध्ये १०० ग्रॅम काजू व १०० ग्रॅम बदाम,दररोज विशिष्ट तेलाने मालिश, असा तब्बल सातशे ते आठशे रुपयांचा रतीब एका बैलास लागतो.यातील परवडने किंवा न परवडने हा व्यवसायाचा भाग जरी असला तरी हा खेळ म्हणजे सन्मानाचा असल्याने एक आत्मिक समाधान या छंदाद्वारे मिळते असे वानखेडे यांनी सांगितले.
असा लागतो 'खुराक'
शयतीच्या एका बैलाच्या खुराकवर मोठा खर्च करावा लागतो. सकाळ व संध्याकाळ ४ लिटर दुध
अंड्यांच्या मेळवनामध्ये १०० ग्रॅम काजू व १०० ग्रॅम बदाम, दररोज विशिष्ट तेलाने मालिश, दररोज ८ गावरान अंडी असा तब्बल सातशे ते आठशे रुपयांचा रतीब एका बैलास लागतो.
गोविंदाची मिळणार साथ
गजानन वानखेडे यांच्याकडे आधीच गोविंदा नावाचा पटावरचा गोन्हा आहे. त्याच्या सोबतीने आता लक्ष्या मैदान गाजविणार आहे. किनगाव राजा येथीलच गोपाल पाटील यांनीही 'मल्हार' नावाच्या शर्यतीचा बैल ३ लाख ६५ हजार रुपयांत माहारा येथून खरेदी केला.
Share your comments