गेल्यावर्षी दूध देणाऱ्या गायी म्हशींवर आलेल्या लम्पी रोगाने अनेक गाई मृत्युमुखी पडल्या. यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. सुमारे 22 कोटी टन दूधाचे उत्पादन देशात होत असून जगाच्या तुलनेत 24 टक्के दूध उत्पादन आपल्या देशात होते.
यंदा सरकारला अंदाजापेक्षा कमी दूधाचे उत्पादन होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यंदा देशाला गरज पडल्यास दूग्धजन्य पदार्थांची आयात करावी लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
दूधाच्या कमतरतेमुळे दूधाच्या किंमतीत यावर्षी पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यात दूधाचा स्टॉकचा अंदाज घेतल्यानंतर जर गरज वाटली तर सरकार लोणी, तूप आदी दूग्धजन्य पदार्थांची आयात करू शकते.
निवडणुकीसाठी १७ बाजार समित्यांकडे पैसेच नाहीत, निवडणूक होणार नाही...
कोरोना साथीमुळे उलट दूधाची मागणी वाढली होती. या काळात दूधाच्या घरगुती मागणीत 8 ते 10 टक्के वाढ झाली आहे. सध्या डेअरी उत्पादनाची स्थिती नीट नाही. दुग्धजन्य पदार्थांची टंचाई जाणवू शकते. तुप, लोणी, पनीर आदी पदार्थांचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.
याकाळात आयात करणे तसे तोट्याचे होऊ शकते, कारण अलिकडील महिन्यात आंतरराष्ट्रीय किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात याबाबत परिस्थिती अजूनच समोर येईल.
Weather Update | वातावरण बदललं सतर्क रहा, राज्यात पावसासह गारपिटीचा इशारा, जाणून घ्या..
त्वचेच्या लम्पी आजाराने 1.89 लाख गुरांचा मृत्यू आणि कोरोना साथीत दूधाची मागणी वाढूनही देशाचे दूध उत्पादन स्थिर राहीले. आता मात्र मागणी वाढली आहे. यामुळे दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
सर्वात जास्त दूध देणारी म्हैस तयार करणारे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शोधून काढले, शेतकऱ्यांना होणार फायदा..
शेतकर्यांना 'हे' सरकार देणार बिनव्याजी कर्ज, जुने कर्ज फेडले की मिळणार ५% अनुदान
सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित, शेतकऱ्यांना होणार फायदा..
Share your comments