1. पशुसंवर्धन

पशुपालकांनो ! अशी घ्या गाभण म्हशींची काळजी

KJ Staff
KJ Staff


म्हशींच्या संगोपनात विशेषतः गरोदरपणात पशुपालकाने जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.  दुर्लक्ष केले तर पशुपालकाचे बरेच नुकसान होऊ शकते.  गरोदरपणाच्या शेवटच्या ३ महिन्यांत अतिरिक्त पोषक द्रव्यांची आवश्यकता असते, कारण यावेळी म्हशीचे वजन २० ते ३० किलोने वाढते.    गाभण काळात म्हशींची  कशी काळजी घ्यायची ते या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

 गर्भधारणेच्या शेवटच्या 3 महिन्यांत काळजी घ्या

 • म्हशींला धावू न देणे  व जास्त चालण्यापासून रोखले पाहिजे.
 •  म्हैस कुठेही घसरू नये याची दक्षता घ्यावी.
 • गर्भधारणा केलेल्या म्हशीला इतर प्राण्यांशी भांडू देऊ नका,  शक्य असल्यास इतर प्राण्यापासून बाजूला बांधा
 • आहारात ३ किलो अतिरिक्त धान्य देणे आवश्यक आहे.
 • पिण्यासाठी नेहमीच स्वच्छ नवीन पाणी द्या.
 • उन्हाळ्यात म्हशीला दिवसातून २ ते ३ वेळा आंघोळ घाला.
 • म्हशींचे घर खाणे वेगळे असले पाहिजे.  यासाठी कव्हर केलेले क्षेत्र १०० ते १२० चौरस फूट आणि १८० ते २०० चौरस फूट मोकळे क्षेत्र पाहिजे.

 


गर्भधारणेच्या
शेवटच्या महिन्यात व्यवस्थापन

 •  म्हशी दूध देत असेल तर म्हशीचे दूध काढणे थांबवा.
 • म्हशीला प्रसुतीपर्यंत दररोज २ ते ३ किलो धान्य द्या.
 •  म्हशीला प्रसूतीच्या  २० ते ३० दिवस आधी गव्हाचा कोंडा आहारात आहार द्या.

 

 गर्भधारणा असताना म्हशीत होत असलेले बदलाचे लक्षणे

 •  प्रसूतीच्या २ ते ३ दिवस आधी म्हशी काहीशी सुस्त होते.
 • आहार  कमी होतो.
 •  पोटातील स्नायू संकुचित होऊ लागतात.
 • योनीमध्ये सूज येते.
 • प्राणी वारंवार लघवी करतात.
 • पुढच्या खुराणे माती कोरायला सुरुवात करतात.

 

 


प्रसूती
  दरम्यान म्हशीची काळजी

 •  प्रसूतीच्या वेळी जनावरांभोवती कोणताही आवाज होऊ नये.
 •  पाण्याची पिशवी दिसल्यानंतर एक तास होईपर्यंत रेडकू बाहेर येत नसेल तर पशुवैद्याची मदत घ्यावी.
 •  स्वच्छ, मऊ कपड्याने रेडकूला पुसून घ्या.
 •  जहार पडल्याशिवाय म्हशीला खायला देऊ नये.
 •  म्हशीला १ ते २ दिवस गूळ आणि बार्लीच्या लापशी खायला घाला.
 •  प्रसूतीनंतर म्हशींची चांगली तपासणी करुन घ्या की कोणत्याही प्रकारच्या प्रजनन रोग आपल्या म्हशीला झाला नाही ना  याची खात्री करा.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters