वाढत्या महागाईमुळे शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह भागविणे देखील मुश्किलीचे बनत चालले आहे. शेतीसोबतच शेतीला पूरक व्यवसाय करणे आता काळाची गरज बनत चालली आहे. जर आपणही शेतकरी असाल आणि शेतीच्या उत्पन्नातून येणाऱ्या पैशातून आपल्या परिवाराचा खर्च भागत नसेल तर आपणही शेतीला पूरक जोडव्यवसाय करू शकता. आज आम्ही खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी एका शेतीला पूरक व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. या व्यवसायाद्वारे आपण महिन्याकाठी दोन लाख रुपये कमवू शकता. शेतकरी मित्रांनो आम्ही व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे शेळीपालनाचा.
शेळी पालनाचा व्यवसाय करून आपण चांगली मोठी कमाई करू शकता, शिवाय हा व्यवसाय शेतीला पूरक असल्याने शेती सांभाळून देखील हा व्यवसाय करता येऊ शकतो. हा व्यवसाय काही अनोळखा व्यवसाय नाहीये याआधी देखील अनेक पशुपालक शेतकरी शेळी पालन करून चांगली मोठी कमाई करत आले आहेत. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे, याबरोबरच पशुपालन देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यास आपले योगदान देत आहे. हा व्यवसाय आपण आपल्या क्षेत्रात देखील सुरू करू शकता किंवा आपण आपल्या गावात देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. शेळीपालन व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कला म्हणून ओळखला जातो.
•हेही वाचा:- बाबोव! नंदुरबार च्या सुप्रसिद्ध सारंगखेडा घोडे बाजारात रावण घोड्याला तब्बल पाच कोटींची लागली बोली, जाणून घ्या याविषयी
सरकार शेळीपालनासाठी देते अनुदान
शेळीपालन व्यवसाय सुरू करणे हे इतर व्यवसायांच्या तुलनेने सोपे आहे. आपण हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करू शकता. शिवाय यासाठी केंद्र सरकार देखील लोन उपलब्ध करून देते, तसंच काही राज्य सरकारे यासाठी अनुदान देखील देतात. केंद्र सरकार शेळी पालन करण्यासाठी 35 टक्के अनुदान शेळी पालक शेतकऱ्यांना देतात. तसेच अनेक सरकारी तसेच खाजगी बँका शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन देतात. नाबार्ड सुद्धा शेळीपालन व्यवसायासाठी लोन देते.
- हेही वाचा:- आश्चर्यकारक! या रेड्याची किंमत आहे तब्बल 21 कोटी रुपये; वजन ऐकून तुम्हीही व्हाल थक्क, जाणुन घ्या याविषयी
शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास शेळीच्या चांगला सुधारित जातींची निवड करणे आवश्यक असते, या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपणास शास्त्रीय पद्धतीने शेळी पालन करणे महत्त्वाचे ठरते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की बकरीचे दूध तसेच मांसला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असते. त्यामुळे शेळीपालन करून सांगली मोठी कमाई केली जाऊ शकते. जर आपण अठरा शेळ्याचे संगोपन केले तर आपणांस जवळपास दोन लाख रुपयांची कमाई होऊ शकते.
Share your comments