1. पशुधन

जाणून घेऊ जनावरांमधील स्नोरिंग डिसीज आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय

स्नोरिंग डिसीज हा रोग प्रामुख्याने सर्व प्रकारच्या जनावरांमध्ये आढळतो. हा आजार ओळखण्याचे प्रमुख लक्षण म्हणजे जनावरांच्या नाकातुन चिकट स्राव वाहतो व श्वास घेतांना नाकातुन घर-घर आवाज येतो. आपल्याकडे ग्रामीण भागात याला घुरघरी किंवा नाकाडी असे म्हणतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
snowring disease

snowring disease

 स्नोरिंग डिसीज हा रोग प्रामुख्याने सर्व प्रकारच्या जनावरांमध्ये आढळतो. हा आजार ओळखण्याचे प्रमुख लक्षण म्हणजे जनावरांच्या नाकातुन चिकट स्राव वाहतो व श्वास घेतांना नाकातुन घर-घर आवाज येतो. आपल्याकडे ग्रामीण भागात याला घुरघरी किंवा नाकाडी असे म्हणतात.

 स्नोरिंग डिसीज या आजाराची लक्षणे

 हजार सर्व प्रकारच्या जनावरांमध्ये आढळतो.स्नोरिंग डिसीज ओळखण्याचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे अरे जेव्हा श्वास घेतात तेव्हा नाकातून घुरघुर असा आवाज येतो. जनावरांच्या नाका मधून सारखा चिकट पदार्थ पडतो तसेच नाका मध्ये कोबीच्या आकारासारखे वाढ झालेली आढळून येते. यावरून आपल्या आजाराचे निदान करू शकतो. कधी कधी नाकातून येणाऱ्या चिकट द्रव याद्वारे  रक्त बाहेर येते. जनावरांना सारखे शिंका येतात.

स्नोरिंग डीसीस या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना

जनावरांना हा रोग होऊ नये यासाठी गोगलगाईच्या नायनाट करणे फार महत्त्वाचे आहे. गुगल यांचा नायनाट करण्यासाठी मोरचूद, फेसकॉन,ब्युसाईड या औषधांच्या द्रावणाची फवारणी करावी.

  • जर जैविक पद्धतीने गोगलगायींच्या नायनाट करायचा असेल तर कोंबड्यापाळल्या तर त्यांच्या सहाय्याने गोगलगाई नष्ट करता येऊ शकतात. कारण कोंबड्या गोगलगाई  वेचून खातात.
  • ज्या जनावराला स्नोरिंग डिसीज  झालेला असेल असे जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे बांधावे.
  • गोगलगाईअसलेल्या ठिकाणी जनावरे चरण्यास नेऊ नये.
  • नदी, तलाव यासारख्या सार्वजनीक पाणवठ्याच्या ठिकाणी पाणी पिण्यास जनावरांना देऊ नये. यावर सर्वात साधा उपाय म्हणजे नदी नाल्याचे पाणी हौदात साठवावे व त्याला झाकण लावू नये कारण सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे निरनिराळ्या प्रकारचे रोगजंतू मरतात आणि गोगल गाईपासून निघालेली फर्कोसर्कस लार्वा उन्हाच्य प्रकाशामुळे आठ तासात मरतात. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिण्यास योग्य राहते. अशा प्रकारे या रोगाचा प्रतिबंध करता येतो.
English Summary: snowring disease in pet animal precaution and care Published on: 16 September 2021, 11:42 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters